विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध

139

राज्याच्या विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून अद्याप विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले. ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला सांगितले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर जाण्याचे संकेत दिसत आहेत. खरंतर आज अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचा होता. परंतु, आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

काय म्हटले राज्यपालांनी पत्रात…

रविवारी, महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी या निवडणुकीबाबत पत्र सादर करून परवानगी देण्याची विनंती केली होती आणि त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी पत्रात केला आहे. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबतची पेच निर्माण झाला आहे.

(हेही वाचा – ‘एसटी’च्या बडतर्फ कर्मचाऱ्यांवर कारवाई होणारच! परबांची विधानसभेत माहिती )

हा निर्णय घटनाबाह्य, राज्यपालांचे मत

राज्यपालांना आघाडीचे नेते भेटले आणि त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यात आली असून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली होती. राज्य सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल केला होता. पूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक होत होती. मात्र, सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलला होता. आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याने तो घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.