१८ महापालिकांच्या निवडणुका : काय असेल भवितव्य? 

नुकत्याच झालेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोट निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले, त्यानंतर लागलेल्या निकालात भाजपाची ताकद सर्वाधिक दिसली, तरी काँग्रेस पक्ष ४ स्थानावरून दुसऱ्या तर शिवसेना दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचल्याचे दिसून आले आहे.

भाजपने मोदी लाटेच्या जोरावर २०१४-२०१८ या काळातील महापालिका निवडणुकांत बहुतांश महापालिकांवर कमळ फुलवले. मात्र २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर केले. आता पुन्हा या महापालिकांच्या निवडणुका येत आहेत. अशा वेळी महाविकास आघाडीने प्रभाग रचनेत बदल केला. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. त्याचा फटका साहजिकच सध्या राजकीय पटलावर एकांगी लढत देणाऱ्या भाजपाला बसणार आहे, असे चित्र आहे. मात्र नुकत्याच झालेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोट निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले, त्यानंतर लागलेल्या निकालात भाजपाची ताकद सर्वाधिक दिसली तरी काँग्रेस पक्ष ४ स्थानावरून दुसऱ्या तर शिवसेना दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही असेच समीकरण राहिले तर मात्र महापालिकांचे लागणारे निकालदेखील आश्चर्यकारक असतील.

कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता?

मुंबई महापालिका

सध्या मुंबई महापालिकेत मनसे आणि सपाच्या पाठिंब्यावर शिवसेना सत्तेत आहे. इथे एक सदस्यीय प्रभागरचना आहे. त्यामुळे त्याचा फायदा सेनेला होईल, असे सांगितले जात आहे, मात्र मागील ३-४ महिन्यांपासून काँग्रेस स्वबळाचा नारा देत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होईल किंवा मनसेमुळे चौरंगी लढत होईल. त्यामुळे सध्या तरी मुंबई महापालिकेचे भवितव्य स्पष्टपणे मांडणे कठीण आहे. मात्र या महापालिकेच्या निकालाचा पुढे राज्याच्या राजकारणावरही परिणाम होणार हे निश्चित आहे.

सत्ताधारी पक्ष – शिवसेना

पक्षीय बलाबल

 • शिवसेना आणि मित्र पक्ष – ९७
 • भाजपा – ८२
 • काँग्रेस – २९
 • राष्ट्रवादी – ८
 • समाजवादी – ६
 • एमआयएम – २
 • मनसे – १

(हेही वाचा : ड्रग्स पार्टीत पार्थ पवार? एनसीबी म्हणते ‘चौकशी सुरु आहे!’)

नवी मुंबई महापालिका

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या महापालिकेचे चित्र पूर्णपणे बदलले. एक हाती वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये गेले. त्यामुळे तिथे भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. नाईक यांच्या पक्षांतरामुळे इथे राष्ट्रवादी नवी मुंबईतून संपुष्टात आल्यात जमा आहे. इथेही एक सदस्यीय प्रभागरचना असल्यामुळे याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला होईल.

सत्ताधारी पक्ष – भाजपा

पक्षीय बलाबल

 • भाजपा – १११
 • शिवसेना – ३८
 • काँग्रेस – १०

मीरा – भाईंदर महापालिका

या महापालिकेत सध्या भाजपाचे वर्चस्व आहे. भाजपा प्रमुख पक्ष आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर इथे गणिते बदलण्याची शक्यता आहे. कारण ३ सदस्यीय प्रभाग रचनेचा सेनेला फायदा होईल. तसा भाजपालाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सत्ताधारी पक्ष – भाजपा

पक्षीय बलाबल

 • भाजपा – ६१
 • शिवसेना – २२
 • काँग्रेस – १०
 • अपेक्ष – २

उल्हासनगर महापालिका

या महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही भाजपा सत्ता काबीज करू शकते. मात्र सध्या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे शिवसेनेला इथे फायदा होऊ शकतो. इथे सेना विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे. बदललेल्या प्रभाग रचनेचा तोटा भाजपाला होण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी पक्ष – भाजपा

पक्षीय बलाबल

 • भाजपा – ४०
 • शिवसेना – २४
 • राष्ट्रवादी – ४
 • आरपीआय (आठवले गट) – ३

(हेही वाचा : ड्रग्स पार्टीत पार्थ पवार? एनसीबी म्हणते ‘चौकशी सुरु आहे!’)

भिवंडी महापालिका

मुंबईच्या बाजूला असलेल्या एकमेव भिवंडी महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. कारण या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. याचा फायदा काँग्रेसला होत आहे. मात्र यावेळी बदलेल्या प्रभाग रचनेमुळे काँग्रेसला फटका बसू शकतो.

सत्ताधारी पक्ष – काँग्रेस

पक्षीय बलाबल

 • भाजपा – २०
 • शिवसेना – १३
 • कोणार्क – ६
 • आरपीआय – ४

ठाणे महापालिका

इथे सेनेकडे सत्ता आहे. शिवाय महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना चांगली ताकद मिळाली आहे. त्यामुळे इथे पुन्हा सेनेचीच सत्ता येऊ शकते असे बोलले जाते.

सत्ताधारी पक्ष – शिवसेना

पक्षीय बलाबल

 • शिवसेना – ६७
 • राष्ट्रवादी – ३४
 • भाजप – २३
 • काँग्रेस – ३
 • एमआयम – २

वसई विरार महापालिका

या महापालिकेत बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. कितीही राजकीय समीकरणे बदलली तरी या ठिकाणी आमदार हितेंद्र ठाकूर महापालिकेत स्वतःचा झेंडा फडकावतात हा इतिहास असल्याने या निवडणुकीत फारसा फरक पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे.

सत्ताधारी पक्ष – बहुजन विकास आघाडी

पक्षीय बलाबल

 • बविआ – १०९
 • शिवसेना – ५
 • भाजपा – १

(हेही वाचा : खोटं बोलणा-यांना त्यावेळी बाळासाहेबांनी काढून टाकले! उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला)

कल्याण – डोंबिवली महापालिका

कल्याण – डोंबिवली महापालिकेत जरी सेनेची सत्ता असली तरी भाजपाची ताकदही बरोबरीची आहे. त्यामुळे या ठिकाणी सेनेला भाजपाचे आव्हान आहे. इथे महाविकास आघाडी झाली तरी ३ सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सेनेला फटका बसू शकतो.

सत्ताधारी पक्ष – शिवसेना

पक्षीय बलाबल

 • शिवसेना – ५३
 • भाजपा – ४३

पुणे महापालिका

मागील निवडणुकीत भाजपाची लाट होती, त्याचा फायदा भाजपाला झाला होता. सध्या सर्वाधिक सदस्य संख्या असल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाच मजबूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र महाविकास आघाडी ही महापालिका आपल्या बाजूने वळवू शकते. अजित पवार हे आपल्या फुटलेल्या नगरसेवकांना पुन्हा पक्षात घेणार, अशी चर्चा काही दिवसांपासून चालू झाल्या आहेत. इथे अजित पवारांचा मुक्काम वाढलेला असल्याने राष्ट्रवादीची तयारी जोरात सुरु असल्याचे चित्र आहे.

सत्ताधारीही पक्ष – भाजपा

पक्षीय बलाबल

 • भाजपा – ९९
 • राष्ट्रवादी – ४२
 • काँग्रेस – १०
 • शिवसेना – १०
 • मनसे – २
 • एमआयएम – १

पिंपरी-चिंचवड महापालिका

गेल्या निवडणुकीत इथे भाजपाने विजय मिळवला असला तरी यातील बरेच नगरसेवक अजित पवारांच्या गटातील होते, हे नगरसेवक परत फिरले तर इथे राष्ट्रवादी पुन्हा मुसंडी मारू शकते. सध्या अजित पवारांचे पुण्यातील वाढलेले दौरे हे राष्ट्रवादीला इथे पुन्हा सत्तेजवळ आणू शकतात.

सत्ताधारी पक्ष – भाजपा

पक्षीय बलाबल

 • भाजपा –  ७७
 • शिवसेना – ९
 • राष्ट्रवादी – ३६
 • मनसे  – १

नाशिक महापालिका

इथे कधी काळी मनसेचा झेंडा फडकत होता. आता तिथे भाजपाने पाय रोवले आहेत. मात्र राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाशिककडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. तसेच छगन भुजबळ यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप पुसल्यामुळे फिनिक्स पक्षाप्रमाणे भुजबळांनी नाशकात भरारी घेतली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये निवडणुकीत काय स्थिती असेल याचा अंदाज सध्या तरी बांधता येत नाही.

सत्ताधारी पक्ष – भाजपा

पक्षीय बलाबल

 • भाजपा – ६६
 • शिवसेना ३५
 • काँग्रेस – ६
 • राष्ट्रवादी – ६
 • मनसे  – ५
 • इतर – ५

कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यावर तोच कोल्हापूर या एकमेव महापालिकेत राबवण्यात आला आहे. मात्र तरीही येथील संपूर्ण राजकारण स्थानिक राजकारणावर अवलंबून असते. कोल्हापुरातील जनतेच्या मनात काय असते, हे सहजासहजी ओळखता येत नाही.

सत्ताधारी पक्ष – महाविकास आघाडी

पक्षीय बलाबल

 • काँग्रेस – ३०
 • राष्ट्रवादी – १४
 • सेना – ४
 • ताराराणी आघाडी – १९
 • भाजपा – १३

सोलापूर

एकेकाळी सुशील शिंदेचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याच्या महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र मोदी लाटेत या जिल्ह्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व वाढले. तरीही इथे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले आहे.

सत्ताधारी पक्ष – शिवसेना

पक्षीय बलाबल

 • भाजपा – ५०
 • शिवसेना – २१
 • काँग्रेस – १४
 • एमआयएम – ९
 • राष्ट्रवादी – ४
 • बसपा – ४
 • माकप – १

औरंगाबाद महापालिका

या ठिकाणी शिवसेनेच्या सर्वाधिक जागा आहेत, मात्र या महापालिकेवर प्रशासक नेमला आहे. सध्या लोकसभा एमआयएमकडे असल्यामुळे एमआयएमची ताकद वाढली आहे. म्हणून या ठिकाणी शिवसेना – भाजपा – एमआयएम अशी लढत होणार आहे.

सत्ताधारी पक्ष – शिवसेना

पक्षीय बलाबल

 • शिवसेना – २५
 • एमआयएम – २९भाजपा – २३
 • काँग्रेस – १०
 • राष्ट्रवादी – ३
 • अपक्ष – १९

नांदेड महापालिका

इथे काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. सत्ताधारी पक्ष काँग्रेस आहे. इथे काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होईल.

सत्ताधारी पक्ष – काँग्रेस

पक्षीय बलाबल

 • काँग्रेस – ७३
 • शिवसेना – १
 • भाजपा – ६

लातूर महापालिका

या महापालिकेत भाजपा आणि काँग्रेस यांची चुरशीची लढत होणार आहे. या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे.

सत्ताधारी पक्ष – भाजपा

पक्षीय बलाबल

 • भाजपा – ३६
 • काँग्रेस – ३३
 • वंचित बहुजन आघाडी – १

परभणी

या ठिकाणी बदलेल्या प्रभाग रचनेचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल अशी चर्चा आहे.

सत्ताधरी पक्ष – काँग्रेस

पक्षीय बलाबल

 • काँग्रेस – ३०
 • राष्ट्रवादी – १७
 • भाजपा – ८
 • शिवसेना – ५

नागपूर महापालिका

या ठिकाणी गडकरी – फडणवीस पुन्हा सत्ता आणू शकतात असा अंदाज बांधला जात आहे, पण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस इथे पुन्हा ताकद वाढली असेल तर मात्र भाजपाला याचा फटका बसू शकतो.

सत्ताधारी पक्ष – भाजपा

पक्षीय बलाबल

 • भाजपा – १०८
 • काँग्रेस – २९
 • बसपा – १०

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here