Election : महाराष्ट्रासोबत वायनाडमध्ये निवडणूक होणार!

212
Election : महाराष्ट्रासोबत वायनाडमध्ये निवडणूक होणार!

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसोबतच केरळच्या वायनाडमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. यानंतर त्यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. प्रियंका गांधी-वाड्रा वायनाडमधून लढणार असल्याची चर्चा आहे. (Election)

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक कधी होणार? असा प्रश्न सध्या देशाची राजधानी दिल्लीच्या वर्तुळात विचारला जात आहे. राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि केरळच्या वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. कॉंग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपला पारंपारिक रायबरेली मतदारसंघ आपल्या मुलासाठी सोडला होता. या दोन्ही जागांवरून ते विजयी झाले होते. यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडचा राजीनामा दिला होता. (Election)

(हेही वाचा – Mulund Police Station : ‘हिंदुस्थान पोस्ट इम्पेक्ट’; विषारी गुटख्याचा ढिगारा हलवला)

या चार राज्यांमध्ये होणार विधानसभेची निवडणूक

राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे वायनाडच्या जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. यात देशातील प्रत्येक मतदारसंघातील समस्या त्या मतदारसंघाचे खासदार उचलत आहेत. परंतु, वायनाडची जनता स्वत:ला पोरकी समजू लागली आहे. कारण, लोकशाहीच्या मंदिरात वायनाडची समस्या उचलणारा आता कुणीही नाही. ज्यांना निवडून दिले होते त्यांनी येथील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे, निवडणूक आयोग जोपर्यंत वायनाडमध्ये पोटनिवडणूक घेणार नाही तोपर्यंत येथील जनतेचा आवाज कुणीही उचलू शकणार नाही. (Election)

दरम्यान, निवडणूक आयोगातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरचा समावेश आहे. या विधानसभेच्या निवडणुकीसोबतच वायनाडमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. चार राज्यांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. यास तीन महिन्याचा कालावधी आहे. या काळात कॉंग्रेससह सत्ताधारी पक्षाला वातावरण निर्मितीची संधी मिळणार आहे. (Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.