Electoral Bonds : सर्वोच्च न्यायालयाने विचारले, ”सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणग्या का मिळतात ?”; काय आहे सरकारचे उत्तर

186
Electoral Bonds : सर्वोच्च न्यायालयाने विचारले, ''सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणग्या का मिळतात ?''; काय आहे सरकारचे उत्तर
Electoral Bonds : सर्वोच्च न्यायालयाने विचारले, ''सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणग्या का मिळतात ?''; काय आहे सरकारचे उत्तर

राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून देणगी मिळत असते. (Electoral Bonds) या इलेक्टोरल बॉन्डला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीविषयी सुनावणी झाली.

या वेळी ‘सर्वाधिक देणग्या सत्ताधारी पक्षांनाच का मिळतात’, असा प्रश्न सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी विचारला. त्यावर सरकारनेही आपली बाजू मांडली. या वेळी केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, ‘पूर्वी पक्षांना रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणग्या मिळायच्या, आता हे बंद झाले आहे. राजकारणातील काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी इलेक्टोरल बॉन्डची प्रणाली लागू केली आहे.’ (Electoral Bonds)

(हेही वाचा – Maratha Reservation : पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले; काय आहे मागणी ?)

‘राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांची माहिती सार्वजनिक करू नये’, या युक्तिवादावरही मेहता यांनी उत्तर दिले. देणगीदारांच्या हितासाठी गुप्तता पाळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावर खंडपिठाचे सदस्य न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले की, या प्रणालीत गुप्तता आहे. सत्ताधारी पक्षाला कोणी देणगी दिली, याची माहिती विरोधी पक्षांना मिळत नाही; पण विरोधी पक्षाला कोणी देणगी दिली, हे सरकारला कळते. यावर असा प्रकार होत नसल्याचे मेहता यांनी सांगितले. २ नोव्हेंबरलाही या प्रकरणावर चर्चा सुरू राहणार आहे. (Electoral Bonds)

पक्षाची विद्यमान स्थिती पाहून देणगी 

सर्वाधिक देणग्या सत्ताधारी पक्षालाच या प्रश्नावर तुषार मेहता म्हणाले की, देणगीदार नेहमीच पक्षाची विद्यमान स्थिती पाहून देणगी देतात. या प्रणालीला सत्ताधारी पक्षाला लाभ देणारे म्हणणे चुकीचे ठरेल. 2004 ते 2014 दरम्यान ही व्यवस्था अस्तित्वात नसतानाही सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या. इलेक्टोरल बॉन्डद्वारे पक्षांना बँकिंग प्रणालीद्वारे पैसे मिळतील, याची खात्री केली गेली आहे.

राष्ट्रीय पक्षांचे उत्पन्न चौपट वाढले 

मेहता यांनी सरन्यायाधिशांना सांगितले की, अज्ञात स्त्रोतांकडून राष्ट्रीय पक्षांचे उत्पन्न 2004-2005 मध्ये अंदाजे 274.13 कोटी रुपये होते, तर 2014-15 मध्ये ते 1130.92 कोटी रुपये झाले. राजकारणातील काळ्या पैशाचे हे स्पष्ट उदाहरण आहे. इलेक्टोरल बॉन्ड योजना याला आळा घालते. ही योजना काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी सरकारच्या इतर व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. (Electoral Bonds)

मंगळवार, 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या चर्चेत याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी आरोप केला होता की, इतर पक्षांच्या तुलनेत भाजपला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून 3 पट देणग्या मिळाल्या आहेत. त्यावर उत्तर देतांना सॉलिसिटर जनरल म्हणाले की, जुन्या व्यवस्थेतही सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळत असत. त्यामुळे या आधारावर इलेक्टोरल बॉन्ड्सला चुकीचे म्हणणे योग्य ठरणार नाही. (Electoral Bonds)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.