देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकत्याच इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक गाडी दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. असे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर्मड इलेक्ट्रिक कार वापरणारे जगातील पहिले पंतप्रधान म्हणून नावारुपाला येतील. तसेच यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी सामान्य नागरिकही आकर्षित होतील, असे सांगण्यात येत आहे.
मोदींच्या ताफ्यात या आहेत गाड्या
CarandBike च्या रिपोर्टनुसार, मोदींच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कारचा समावेश करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात मर्सिडीज Maybach S650, Range rover आणि Toyota Land Cruiser यांसारख्या आर्मड गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या बुलेटप्रूफ असून यांमुळे स्फोटांपासूनही संरक्षण होते. त्यामुळे मोदींच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार दाखल झाल्या तर त्या सुद्धा आर्मड कार प्रमाणेच पॉवरफुल असतील.
(हेही वाचाः Asia Cup 2022: आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार भारत-पाकिस्तान सामना)
कोणती इलेक्ट्रिक गाडी येणार?
मोदींच्या ताफ्यात नेमक्या कोणत्या इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश करण्यात येईल याबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाही. आर्मड इलेक्ट्रिक कारची नेमकी संख्या सध्या उपलब्ध नसल्यामुळे याबाबत आताच माहिती देणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे.