राज्यात होणार एलएनजीपासून वीजनिर्मिती

116

राज्यात आता एलएनजीपासून वीजनिर्मिती होणार आहे. राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने मंगळवारी किंग्ज् गॅस कंपनीसोबत ऊर्जा विभागाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला. या करारामुळे राज्याला स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीसाठी मदत होणार आहे. याबाबतचा पायलट प्रकल्प उरणमध्ये राबविला जाणार आहे.

( हेही वाचा : दिवाळीच्या नावावर ‘चलो अ‍ॅप’चे सबस्क्राईबर वाढवण्याची बेस्टची योजना; करा ९ रुपयांमध्ये ५ वेळा बस प्रवास)

लिक्विफाइड नॅचरल गॅस हे ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्वच्छ आणि सुरक्षित इंधन मानले जाते. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते, त्याचबरोबर त्यातून कचऱ्याचीही निर्मिती होत नाही, त्याची कार्यक्षमता अधिक असून त्यामुळे राज्याची विजेची मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे. यासंदर्भातील सामंजस्य करार महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग व कतार येथील किंग्ज् गॅस कंपनीसोबत सह्याद्री अतिथी गृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी डॉ. पी अनबलगन, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

वीजनिर्मितीची कार्यक्षमताही वाढेल – फडणवीस

या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राला अधिक आणि स्वच्छ वीज निर्मिती करता येणार आहे. कमी कार्बन उत्सर्जनामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होईल, कचऱ्याला पायबंद घालण्याबरोबरच लिक्विफाइड नॅचरल गॅसमुळे वीजनिर्मितीची कार्यक्षमताही वाढेल. लिक्वीड नॅचरल गॅस एक उत्तम पर्याय असून येत्या काळात हा गॅस अधिक उपयुक्त आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. इतर इंधन वापरामुळे निर्माण होणाऱ्या कार्बनचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी देखील लिक्वीड नॅचरल गॅस सहाय्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभागाने केलेला हा सामंजस्य करार महत्त्वाचा आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.