नुकतेच महाराष्ट्र आणि झारखंड येथे विधानसभा निवडणुका पार पडल्या. तसेच काही ठिकाणी पोटनिवडणूकही पार पडली. त्याचा निकालही तीन दिवसांनी घोषित करण्यात आला. (Maharashtra Assembly Election Result) लोकसभा निवडणुकीच्या वेळीही भारतात एकाच दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी करण्यात आली. याउलट कॅलिफोर्नियामध्ये निवडणुकीच्या १८ दिवसांनंतरही मते मोजली जात आहेत. यावर एका दिवसात भारताची ६४ कोटी मते कशी मोजली गेली, असा प्रश्नही मस्क यांनी उपस्थित केला आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्रीपद भाजपाकडे ?; अमित शाह काढणार Eknath Shinde यांची समजूत)
India counted 640 million votes in 1 day.
California is still counting votes 🤦♂️ https://t.co/ai8JmWxas6
— Elon Musk (@elonmusk) November 24, 2024
अमेरिकेत ५ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरूच आहे. (US Election) त्यामुळे टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक पद्धतीचे कौतुक केले आहे. भारताने महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसह अनेक राज्यांतील पोटनिवडणुका आणि लोकसभेच्या काही जागांचा निकाल जाहीर केला आहे. त्यावरून मस्क यांनी भारताच्या निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे.
इलॉन मस्क यांनी यापूर्वी ईव्हीएमवर (EVM) प्रश्न उपस्थित केले होते. मतपत्रिका वापराव्यात आणि त्यांची हाताने मोजणी करावी, असे त्यांचे मत त्यांनी यापूर्वी व्यक्त केले होते. त्यामुळे आता त्यांनी ईव्हीएमवर भाष्य करणे हा चर्चेचा विषय आहे.
अमेरिकेतील मतदानाची पद्धत कशी आहे ?
अमेरिकेत बहुतेक मतदान कागदी मतपत्रिका किंवा ई-मेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. २०२४च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी मशीन्सचा वापर फक्त ५ टक्के क्षेत्रात करण्यात आला. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वांत मोठे राज्य आहे. येथे ३.९ कोटी लोक रहातात. ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत १.६ कोटी लोकांनी मतदान केले होते. मतदानाला दोन आठवडे उलटले तरी अद्याप सुमारे तीन लाख मतांची मोजणी व्हायची आहे. अमेरिकेत दरवर्षी मतमोजणी व्हायला आठवडा लागतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community