गेल्या काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क सेल्मन बनले असल्याची चर्चा सोशल मिडीयावर होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मस्क चर्चेत आले आहे. एलॉन मस्क यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये मस्क ट्विटरच्या कार्यालयात एन्ट्री घेताना दिसताय. इतकेच नाही तर त्यांच्या हातात वॉश बेसिन घेऊन ते ट्विटरच्या कार्यालयात येताना दिसतात. त्यांच्या या अनोख्या एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर कमेंट आणि लाईकचा वर्षाव होत आहे.
(हेही वाचा – नोटांवर ‘या’ महापुरुषांसह मोदींचाही फोटो लावा; भाजपच्या राम कदमांची मागणी, ट्वीट व्हायरल)
एलॉन मस्क यांनी फ्रान्सिस्को येथील ट्विटरच्या कार्यालयात गेल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मस्क यांनी ४४ बिलियन डॉलरची ट्वीटर डील क्लोड करण्यात मग्न आहेत. त्यांनी १३ एप्रिल रोजी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. याच डीलसाठी ते ट्विटरच्या हेड क्वॉर्टरमध्ये गेले होते. त्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. याच व्हिडिओमध्ये त्यांच्या हाता बेसिन सिंक दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘Entering Twitter HQ – let that sink in!. असे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान, मस्क यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईल बायोमध्ये Chief Twit असेही लिहिल्याचे बघायला मिळत आहे. त्यावरून तेच ट्विटरचे पुढील बॉस असणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, मस्क यांनी ट्विटर खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.
बघा व्हायरल व्हिडिओ
Join Our WhatsApp CommunityEntering Twitter HQ – let that sink in! pic.twitter.com/D68z4K2wq7
— Elon Musk (@elonmusk) October 26, 2022