अफगाणिस्तानच्या दूतावासाने रविवार, १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतातील आपले कामकाज थांबवले आहे. (Afghanistan) भारत सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला आहे. भारत सरकारकडून आणि मुत्सद्द्यांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचा दावा अफगाणिस्तानच्या दूतावासाने केला आहे. नवी दिल्लीतल्या अफगाणिस्तानच्या दूतावासाचे भारतातले कामकाज बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना आम्हाला खूप निराशा, दुःख आणि खेद वाटतो, असे निवेदन अफगाणिस्तानने केले आहे. दूतावासाने म्हटले आहे की, हा निर्णय अत्यंत खेदजनक असला तरी, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंध आणि दीर्घकालीन सहकार्य लक्षात घेऊन काळजीपूर्वक विचार करून घेण्यात आला आहे. भारतात राजनैतिक समर्थनाची कमतरता आहे आणि काबूलमध्ये कायद्याने कार्यरत सरकारची उणीव आहे. (Afghanistan)
(हेही वाचा – Pakistan : चोराच्या उलट्या बोंबा; स्फोटाच्या प्रकरणी पाकचे भारतावर आरोप)
दूतावासाच्या ताब्यातील अधिकार यजमान देशाकडे हस्तांतरित होईपर्यंत अफगाणी नागरिकांसाठी आपत्कालीन वाणिज्यदूत सेवा कार्यरत राहतील, असे अफगाणिस्तानने म्हटले आहे. अफगाण दूतावासातील राजदूत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारत सोडून युरोप आणि अमेरिकेत आश्रय घेतल्यानंतर ही घटना घडली आहे. किमान पाच अफगाण राजनैतिक अधिकारी भारत सोडून गेले आहेत, अशी माहिती दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिली. (Afghanistan)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला नवी दिल्लीतील कामकाज बंद करण्याच्या निर्णयाबद्दल यापूर्वी माहिती देण्यात आली होती. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर भारताने अफगाणिस्तानमधील आपला दूतावास बंद केला होता. सध्या भारत सरकारने राजदूत फरीद मामुंदझे आणि अफगाणिस्तानचे तत्कलिन अध्यक्ष अश्रफ घनी यांनी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना व्हिसा जारी करण्यास आणि भारतातील व्यापारविषयक बाबी हाताळण्याची परवानगी दिली आहे. (Afghanistan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community