भारतात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेचा दाखला देत सत्ताधारी भाजप कॉंग्रेसवर टीका करत आहे. या निमित्ताने भाजपाने निषेध व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात कधीच आणीबाणी विस्मरणात जाणार नाही, अशा शब्दांत आणीबाणीवर टीका केली आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने देखील कॉंग्रेसला लक्ष्य केले.
When constitution was misused to makes slaves of people by those who today talk about freedom! #DarkDaysOfEmergency
— Gautam Gambhir (@GautamGambhir) June 25, 2023
आज स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी जनतेला गुलाम बनवण्यासाठी तेव्हा संविधानाचा दुरुपयोग केला, अशा शब्दांत गौतम गंभीरने कॉंग्रेसवर निशाणा साधला. मोदींकडून आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना श्रद्धांजलीज्या लोकांनी देशात लोकशाहीची भावना बळकट करण्यासाठी काम करत आणीबाणीला विरोध केला, त्या लोकांना मी श्रद्धांजली वाहतो. आणीबाणी हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय काळ आहे, जो पूर्णपणे संविधानाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
(हेही वाचा Vande Bharat Express : अखेर ‘या’ दिवसापासून कोकणच्या मार्गावरून धावणार वंदे भारत)
Join Our WhatsApp Community