गृहमंत्री अमित शहा यांच्या विमानाचे गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग, कारण आले समोर

92

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विमानाचे बुधवारी गुवाहाटी येथील बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपात्कालीन लॅंडिंग करावे लागले. बुधारी रात्री अमित शाह आगरतळाला पोहोचणार होते, पण खराब वातावरणामुळे त्यांच्या विमानाचे सकाळी 10:45 च्या सुमारास गुवाहाटी येथे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले.

अमित शाह बुधवारी ईशान्येकडील राज्यांकडे रवाना झाले होते. त्रिपुरामध्ये होणा-या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा हा दौरा नियोजित करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ईशान्येकडील राज्यात दोन रथयात्रा निघणार होत्या. त्रिपुरामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.

( हेही वाचा: १५ दिवसांत माफी मागा, नाहीतर…; राहुल शेवाळेंनी ‘सामना’वर ठोकला अब्रुनुकसानीचा दावा )

शाहांचा मुक्काम गुवाहाटीतच 

अमित शाह यांच्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले, यासंदर्भात महिती देताना, पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधीक्षक शंकर देबनाथ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी रात्री 10 वाजता एमबीबी विमानतळावर उतरणार होते. परंतु दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानाचे लॅंडिंग करणे शक्य झाले नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांनी सांगितले की, उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर आणि दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सबरुम उपविभातून रथयात्रेला झेंडा दाखवण्यासाठी शाह बुधवारी आगरतळा येथे पोहोचणार होते. परंतु, इमर्जन्सी लॅंडिंगमुळे अमित शाहांना आपला मुक्काम गुवाहाटीतच करावा लागला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.