Emergency चित्रपट Uncut स्वरूपातच प्रदर्शित करणार; कंगना रानौत यांचा निश्चय

या चित्रपटात 'खलिस्तानी' हा शब्द वापरता येत नाही, इंदिरा गांधींची हत्या करताना शीखांना दाखवता येत नाही, असे सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, हे चुकीचे आहे.

140
ज्या गोष्टींवर आक्षेप आहे तो चित्रपटाचा (Emergency) एक छोटासा भाग आहे, त्यावरून गोंधळ निर्माण केला जात आहे. लोक आम्हाला प्रत्येक गोष्टीवर घाबरवत राहतात, मग आम्ही झुडपांच्या मागे रोमँटिक चित्रपट बनवत राहू. सेन्सॉर बोर्डाने आमचे प्रमाणपत्र रोखून धरले आहे, परंतु मी चित्रपटाची अनकट आवृत्तीच प्रदर्शित करणार आहे, त्याकरता मी न्यायालयात लढेन. इंदिरा गांधींचे अचानक निधन झाल्याचे मी दाखवू शकत नाही. .

अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ (Emergency) चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अद्याप मंजुरीही दिलेली नाही. हा चित्रपट आणीबाणी आणि इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाची खासदार देखील आहे. या चित्रपटविषयी बोलताना कंगना म्हणाली, या चित्रपटात ‘खलिस्तानी’ हा शब्द वापरता येत नाही, इंदिरा गांधींची हत्या करताना शीखांना दाखवता येत नाही, असे सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, हे चुकीचे आहे.

(हेही वाचा जातीनिहाय जनगणनेची मागणी करणारी याचिका Supreme Court ने फेटाळली)

अराजक माजवणाऱ्यांचेही हेच आक्षेप आहेत, ते याचिका दाखल करून चित्रपट (Emergency) थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. कंगना राणौत म्हणाली की, अशा लोकांना त्यांच्या अस्तित्वाची समस्या असू शकते. मी नेहमीच एकटी राहते. हा चित्रपट आपण कोणत्याही पक्षासाठी, कुणाला अपमानित करण्यासाठी किंवा कोणत्याही समाजाला दुखावण्यासाठी बनवलेला नसून अतिशय प्रामाणिकपणे बनवला असल्याचे सांगितले.
‘तनु वेड्स मनू’ मालिकेतील आणि ‘क्वीन’ चित्रपटातील अभिनेत्री कंगना राणौतने तिला दिल्या जात असलेल्या धमक्यांबाबतही सांगितले. मला इतके टार्गेट केले जाईल असे कधीच वाटले नव्हते. हा चित्रपट 4 इतिहासकारांच्या मदतीने बनवण्यात आला आहे, ज्यात त्या काळातील ज्येष्ठ पत्रकार देखील तुरुंगात गेले होते. कंगना राणौतच्या मते, गन पॉइंटवर ठेवून यंत्रणा चालवण्याचा समज आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, जेव्हा तिच्याविरुद्ध शिवीगाळ होते आणि नंतर सर्वांना त्याची सवय होते, तिला पंजाबमधूनही शिवीगाळ होते, तिला ‘एक्स’ आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शिवीगाळ होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.