Colaba Constituency तील टक्केवारी वाढवण्यावर दिला जातो भर

97
Colaba Constituency तील टक्केवारी वाढवण्यावर दिला जातो भर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील कुलाबा मतदारसंघात (Colaba Constituency) सर्वांत कमी मतदान झाल्याने याबाबत केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी तीव्र चिंता व्यक्त केल्यानंतर या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. कफ परेड बेव्ह्यू मरीना गार्डन, येथे आयोजित कुलाबा परिसरातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी संवाद उपक्रम आयोजित केला होता. लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेऊन मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी जागरूक व जबाबदार नागरिक म्हणून कुलाबा मतदारसंघातील मतदारांनी पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी येथे केले.

(हेही वाचा – Uddhav Thackeray म्हणाले, जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री करा, माझी हरकत नाही)

लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये कुलाबा मतदारसंघाचा समावेश होता. राज्याच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या क्षेत्रात वेगळे स्थान असलेल्या कुलाबा (Colaba Constituency) सारख्या नामांकित ठिकाणातील मतदान टक्केवारी कमी असणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे निवडणूक आयोग मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची जनजागृती करण्याचे काम करत आहे. राज्यात विविध मतदारसंघात जनजागृती उपक्रमाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांनी मतदान प्रक्रियेविषयी व्यापक आणि कृतीशील दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले.

(हेही वाचा – काँग्रेसशासित राज्यांमध्ये जनतेची केवळ फसवणूकच; BJP नेत्यांनी केली पोलखोल)

मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदारांना आपले नाव व मतदान केंद्र शोधणे सोपे व्हावे म्हणून मतदार यादी संकेतस्थळावर तसेच वोटर ॲपवर उपलब्ध आहे. विधानसभा निवडणुकांसाठी उंच इमारती व गृहसंकुलांसाठी १,१८५ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून केंद्र परिसरात वाहनतळ सुविधा, तसेच दोन किलोमीटरच्या अंतरावर मतदान केंद्रांची सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व सुविधांचा लाभ घेत, मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी केले.(Colaba Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.