स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात म्हूण विधिमंडळ अधिवेशनात नवीन कायदा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. तसेच सरकारमधील क वर्ग पदांची भरती राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन ही पदे आयोगाकडे वर्ग केली जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. (DCM Devendra Fadnavis)
मृद आणि जलसंधारण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या अधिकारी गट ब आणि अराजपत्रित पदाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. आता राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. (DCM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Mumbai Vehicle Thief: मुंबई पोलिसांनी जाहीर केली आकडेवारी; पाच महिन्यांत वाहन चोरीची संख्या हजाराच्या घरात!)
गेल्या दोन वर्षात एक लाख पदे भरण्याची ऐतिहासिक कामगिरी या सरकारने केली आहे. राज्य सरकारने ७५ हजार पदे भरतीची घोषणा केली होती. त्यापैकी ५७ हजार ४५२ जणांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत तर १९ हजार ८५३ जणांना नियुक्तीचे आदेश देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच ३१ हजार २०१ पदांसाठी भरतीची कार्यवाही सुरु आहे. या पुढील काळात निरंतर भरती प्रक्रिया सुरू राहील. गट ‘क’ वर्गाच्या जागा टप्प्या टप्प्याने राज्य लोकसेवा आयोगाकडे वर्ग करण्यात येणार आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. (DCM Devendra Fadnavis)
मृद आणि जलसंधारण विभागाअंतर्गत राजपत्रित पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेरपरीक्षा घेण्याबाबत आणि या परीक्षेशी संबंधित गैरप्रकार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मृद आणि जलसंधारण विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.सदर परीक्षा टीसीएस आणि आयबीपीएसतर्फे होतील, असेही फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. यावेळी राजेश टोपे, आशिष शेलार, भास्कर जाधव, अनिल देशमुख, प्रकाश आबिटकर, रोहित पवार आदींनी उपप्रश्न विचारले. (DCM Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community