वीज फुकटात मिळत नाही, बिल भरावेच लागणार! नितीन राऊतांचे शेतक-यांना फर्मान

90

राज्याच्या ऊर्जा विभागाने सध्या शेतक-यांच्या थकीत वीजबिलावरून कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात भाजपाने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. अशा वेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळसा लागतो, पैसा लागतो, कर्ज काढावे लागते, ते कुठून आणायचे?, असा सवाल करत शेतक-यांना बील भरावेच लागणार, असे ते म्हणाले.

राज्यात वीजबिल थकित असल्यामुळे कृषी पंपाचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ऊर्जा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. नुकतीच पेरणी झालेली, गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचे काम सुरु असताना वीज कनेक्शन कापले जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऊर्जा विभागाच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले, शेतकऱ्यांना वीजबिल भरावेच लागेल. फार तर त्यांनी वीजबिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे. भाजपने सवय लावून ठेवली आहे. महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आला आहे, तो भरायचा कुठून?, असा सवाल नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना केला.

(हेही वाचा सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना बनली सावरकर विरोधी! चित्रा वाघ यांचे टीकास्त्र)

महाराष्ट्राला जीएसटीचा परतावा का नाही?

उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. इंधनाचे दर कमी करण्याबाबत केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचा आहे. राज्य सरकारवर का ढकलले जाते? भाजपशासित राज्यांना जीएसटीचा परतावा दिला जातो, मग महाराष्ट्राला का दिला जात नाही? महाराष्ट्राकडे बोट दाखवण्याचा काम का करतात? अशी प्रश्नांची सरबत्ती नितीन राऊत यांनी यावेळी केली.

राजू शेट्टींचा विरोध

या प्रकरणी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे. शेतक-यांचे वीज कनेक्शन तोडले, तर जशास तसे उत्तर देऊ, शेतक-यांना दिलेला सदोष वीजबिले दुरूस्त करून द्यावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.