माजी आमदाराची कोट्यावधींची संपत्ती ईडीने घेतली ताब्यात

एकूण २३४ कोटीची संपत्ती ईडीने ताब्यात घेतली आहे.

76

कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेकानंद पाटील यांची २३४ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने ताब्यात घेतली आहे. या संपत्तीत कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी आणि इतर जमिनीचा समावेश आहे. विवेकानंद पाटील यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

५६० कोटी रुपायांचे कर्ज

कर्नाळा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदार अशा एकूण ७६ जणांवर ठेवीदार-खातेदारांची फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी फेब्रवारी महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मनी लॉन्डरिंग गुन्ह्याबाबत सक्तवसुली संचनालया(ईडी)ने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला होता. त्यानंतर १५ जून रोजी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली होती. ईडीच्या तपासात ६७ बोगस बँक खाते उघडून सुमारे ५६० कोटी रुपायांचे कर्ज बँकेतून घेण्यात आले होते. कर्जाची रक्कम बोगस खात्यातून निधीच्या माध्यमातून पाटील यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्था, बँक खात्यात वळवण्यात आली होती.

(हेही वाचाः अनिल देशमुखांना बुधवारी होणार अटक?)

ईडीची कारवाई

या निधीचा वापर कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा क्रीडा अकादमी या संस्थेकडे वळवण्यात आलेल्या या निधीचा उपयोग क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यांसारख्या संपत्तीच्या बांधकामासाठी आणि इतर वैयक्तिक फायद्यांसाठी केला असल्याचे ईडीने म्हटले आहे. बँक घोटाळ्यातील पैशांचा वापर करण्यात आलेल्या कर्नाळा क्रीडा संकुल आणि इतर जमिनी अशी एकूण २३४ कोटीची संपत्ती ईडीने ताब्यात घेतली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.