राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाचवे समन्स पाठवून देखील ते बुधवारी, 18 सकाळी ईडीच्या कार्यालयात गैरहजर राहिले. मात्र देशमुख यांचे वकील इंद्रजित सिंग यांनी ईडीच्या अधिकारी यांची भेट घेऊन अनिल देशमुख यांच्यावतीने ईडीला निवेदन सादर केले आहे. ईडीने अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख या दोघांना समन्स बजावून बुधवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!
“आम्ही ईडीला पूर्णपणे सहकार्य करत आहोत, आमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे, असे वकील इंद्रजित सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, तसेच सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतलेली असतानाच, ईडीकडून वारंवार समन्स का पाठवले जात आहे, हे कळत नाही?, असे इंद्रजीत सिंग यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा : स्वरा भास्करला अटक करा! का सुरु झाला ट्विटर ट्रेंड?)
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नाही
अनिल देशमुख हे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात जाणार का? पत्रकारांच्या या प्रश्नाला देशमुख यांच्या वकिलांनी असे म्हटले की, अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात असतांना अटकपूर्व जामिनासाठी जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही ईडीने पाठवलेल्या समन्सबाबत ईडीला देशमुख यांच्या वतीने निवेदन दिले असल्याचे वकील इंद्रजित सिंग यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community