शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने अर्थात ईडीने शुक्रवारी सकाळी छापेमारी केली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली आहे.
बारा जणांच्या पथकाकडून तपासणी
समोर आलेल्या माहितीनुसार, जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आज सकाळी साडे आठ वाजेदरम्यान, ईडीने धाड टाकली. सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ईडीकडून तपासणीही करण्यात आली आहे. बारा जणांच्या पथकासह सकाळी खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली. यावेळी औरंगाबाद मधील एका उद्योजक आणि व्यावसायिकाच्या घऱी ईडीने केलेल्या छापेमारीचा संबंध खोतकरांशी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोपांच्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या निवासस्थानी ही धाड टाकली आहे.
(हेही वाचा –नाशिक हादरलं! भाजप पदाधिकारी इघेंची निर्घृण हत्या)
खोतरांकडून स्पष्टीकरण
ईडीने छापा टाकला तेव्हा अर्जुन खोतकर हे घरीच होते. औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये अर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यापूर्वी खोतकरांनी हे आरोप फेटाळून लावले असून त्यांचे काही लाखांचे शेअर्स या कारखान्यात आहे आणि आपण भागीदार आहोत, मालक नाही असेही खोतकरांनी स्पष्ट केले आहे.
असा केला सोमय्यांनी आरोप
- औरंगाबाद मध्ये छापा टाकण्यात आलेल्या एका उद्योजकाचे आणि व्यावसायिकाचे खोतकर यांच्यशी साखर कारखान्याच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध
- औरंगाबाद मधील एका उद्योजकाने 43 कोटींचा कारखाना अर्जुन खोतकर यांच्या अर्जुन सीडस इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला 27.58 कोटी रुपयांना विकला