हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. या जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. आरटीई प्रवेशासाठी शाळांना दरवर्षी नोंदणी करणे अनिवार्य असते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणीकडे शाळांना पाठ फिरवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
२७८ शाळांनी नोंदणीकडे फिरवली पाठ
आतापर्यंत ३२६ पैकी केवळ ५८ शाळांनी नोंदणी केली आहे. २७८ शाळांनी नोंदणीकडे पाठ फिरवल्याचे आरटीई पोर्टलवरील माहितीनुसार दिसून येत आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले होते. शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रवेशासाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. पालकांना अाता १६ फेब्रुवारीपासून अाॅनलाइन अर्ज भरता येतील. https:/student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पालकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
(हेही वाचा आदित्य ठाकरेंना गोव्यात गेलेल्या सेना नेत्यांविषयी शंका! कोणती ते वाचा…)
Join Our WhatsApp Community