देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! EPFO ची विशेष योजना कार्यान्वित होणार

174

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या 29 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली लागू करण्याच्या प्रस्तावावर विचार केल्यानंतर त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर देशभरातील 73 पेन्शनधारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन एकाच वेळी ट्रान्सफर केले जाऊ शकते. सध्या EPFO ची 138 प्रादेशिक कार्यालये आपल्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन ट्रान्सफर करतात.

काय आहे विशेष योजना?

EPFO ची १३० प्रादेशिक कार्यालये पेन्शनधारकांना वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या वेळेला पेन्शन ट्रान्सफर करतात त्यामुळे लाभार्थ्यांनाही ते त्या त्या वेळी मिळते. 29 आणि 30 जुलै रोजी होणार्‍या EPFO ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टच्या (CBT) बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणालीच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. ही प्रणाली लागू केल्यानंतर 138 क्षेत्रीय कार्यालयांच्या डेटाबेसच्या आधारे पेन्शनचे वितरण केले जाईल. यामुळे 73 लाख पेन्शनधारकांना एकाच वेळी पेन्शन दिली जाणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील पेन्शनधारकांच्या गरजा वेगळ्या पद्धतीने हाताळतात. यामुळे पेन्शनधारक वेगवेगळ्या दिवशी पेन्शन देऊ शकतात. 20 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या CBT च्या 229 व्या बैठकीत, C-DAC द्वारे केंद्रीकृत IT आधारित प्रणाली विकसित करण्याच्या प्रस्तावाला विश्वस्तांनी मान्यता दिली होती. कामगार मंत्रालयाने बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यानंतर प्रादेशिक कार्यालयांचे तपशील टप्प्याटप्प्याने केंद्रीय डेटाबेसकडे हस्तांतरित केले जातील. यामुळे सेवांचे संचालन आणि पुरवठा सुलभ होईल. ही प्रणाली लागू झाल्यानंतर देशभरातील 73 पेन्शनधारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन एकाच वेळी ट्रान्सफर केले जाऊ शकते.

(हेही वाचा औरंगाबाद नामांतराच्या निर्णयाची आम्हाला पूर्वकल्पना नव्हती! शरद पवारांचा ठाकरे सरकारबाबत गौप्यस्फोट )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.