काँग्रेसची ‘EAGLE’ समिती स्थापन; निवडणुकीतील पारदर्शकतेवर नजर

46
काँग्रेसची ‘EAGLE’ समिती स्थापन; निवडणुकीतील पारदर्शकतेवर नजर
  • प्रतिनिधी

देशभरात लोकसभेच्या तसेच काही महत्त्वपूर्ण राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी तातडीने ‘एम्पॉवर्ड अ‍ॅक्शन ग्रुप ऑफ लीडर्स अँड एक्स्पर्ट्स’ (EAGLE) या नव्या समितीची स्थापना केली आहे. यामुळेच काँग्रेसचे वरातीमागून घोडे अशीच काहीशी अवस्था दिसून येत आहे. या समितीचे उद्दिष्ट देशातील निवडणुकांच्या स्वच्छ आणि निष्पक्ष आयोजनावर लक्ष ठेवणे असेल.

समितीचा उद्देश आणि जबाबदाऱ्या

EAGLE समिती प्रथम महाराष्ट्रातील मतदारयादीतील छेडछाडीचा सखोल अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल सादर करेल. तसेच, मागील निवडणुकांचे विश्लेषण करून आगामी निवडणुकांवरील संभाव्य प्रभावांचा अंदाज घेणार आहे.

ही समिती मतदान प्रक्रियेत होणाऱ्या अपारदर्शकता, गैरप्रकार किंवा मतदारयादीतील अनियमितता शोधून त्यावर योग्य ती कारवाई सुचवेल. (EAGLE)

(हेही वाचा – Davis Cup 2025 : टोगोला सरळ सामन्यांत हरवून भारतीय संघ पुन्हा एकदा जागतिक गटात)

EAGLE समितीचे प्रमुख सदस्य :
  1. अजय माकन
  2. दिग्विजय सिंह
  3. डॉ. अभिषेक मनु सिंघवी
  4. प्रवीण चक्रवर्ती
  5. पवन खेडा
  6. गुरदीप सिंग सप्पल
  7. डॉ. नितीन राऊत
  8. चल्ला वमशी चंद रेड्डी
राजकीय घडामोडींवर काँग्रेसचा ठाम निर्धार

EAGLE समिती देशभरातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवणार असून निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य गैरप्रकार उघड करणार आहे.

काँग्रेसने या नव्या समितीच्या स्थापनेद्वारे निवडणुकीच्या निष्पक्षतेसाठी प्रभावी पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. (EAGLE)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.