Maharashtra Assembly Winter Session : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आमदारांकडून हरताळ!

99
Maharashtra Assembly Winter Session : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आमदारांकडून हरताळ!
  • सुजित महामुलकर

राज्य विधिमंडळाच्या मुंबईतील पहिल्या विशेष अधिवेशनात नव्या आमदारांचा शपथविधी झाला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरातील कार्यकर्त्यांची गर्दी कमी करण्याचे आवाहन सर्व आमदारांना केले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे उपाययोजना करणाची मागणी केली. सध्या नागपूरला फडणवीस सरकारचे पहिलेवाहिले हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर २०२४ पासून सुरू झाले, मात्र गर्दीला काही अंत नाही. विशेष म्हणजे सरसकट सर्वपक्षीय आमदारांनी फडणवीस यांच्या आवाहनाला पाठिंबा तर दिला मात्र ‘पालथ्या घड्यावर पाणी’. कार्यकर्त्यांना नाराज करण्याचे धाडस न दाखवता त्यांना प्रवेश पत्र देण्याची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा पुढे सरसावल्याचे निदर्शनास आले आहे. (Maharashtra Assembly Winter Session)

मंत्र्यांच्या दालनातही गर्दी

फडणवीस यांनी मुंबईतील विशेष अधिवेशनात आमदारांना उद्देशून म्हटले की, आमदारांना वाईट वाटेल पण विधान भवनमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा काम करणे कठीण होईल. ते पुढे म्हणाले की, अनेक मंत्र्यांच्या दालनात जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. फडणवीस यांच्या आवाहनाला सर्वच आमदारांनी समर्थन दिले पण प्रत्यक्षात गर्दीचा ओघ काही कमी झालेला दिसला नाही. (Maharashtra Assembly Winter Session)

(हेही वाचा – Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मीडिया जसप्रीत बुमराहच्या प्रेमात)

आमदारच प्रवेश पत्रासाठी दारात

नागपूरला विधिमंडळाच्या अधिवेशनाला विविध भागातून कार्यकर्त्यांची रिघ विधानभवनकडे येऊ लागली. आमदारही कार्यकर्त्यांना प्रवेश पत्र देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे पत्र घेऊन पोहोचू लागले. शक्य तितक्या कार्यकर्त्यांना प्रवेश पत्रे देण्यात आलीही पण आमदारांच्या पत्रालाही आता नियंत्रण राहिले नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Assembly Winter Session)

आमदार सेल्फी देतात तेव्हा..

शनिवारी २१ डिसेंबर २०२४ आदिवेशनचा शेवटचा दिवस असल्याने गुरुवारी १९ डिसेंबरपासूनच प्रवेश पत्रांची मागणी प्रचंड वाढल्याचे स्पष्ट झाले असून आमदार स्वतः पत्र घेऊन विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचत आहेत. एकदा प्रवेश पत्र मिळाले आणि आमदारची भेट झाली किंवा काम झाले तरी कार्यकर्ते विधानभवन परिसर सोडण्यास तयार होत नाहीत. विधानसभा किंवा विधान परिषद सभागृहातून आमदार किंवा मंत्री बाहेर पडताच पायऱ्यांवर त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तोबा गर्दी करताना दिसत असून आमदारही सेल्फी देण्यास टाळाटाळ करत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन आमदारांनी किती गांभीर्याने घेतले, हा प्रश्न केला जात आहे. (Maharashtra Assembly Winter Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.