चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) कॉंग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाल्याचा सर्वाधिक आनंद इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) घटक पक्षांच्या नेत्यांना झाला आहे, असे दिसून येत आहे. घटक पक्षाच्या नेत्यांनी आता कॉंग्रेसच्या (Congress) विरोधात दबाव तंत्र वापरण्यास सुरुवात केले आहे. (I.N.D.I. Alliance)
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी मंगळवार (१९ डिसेंबर) रोजी दिल्लीत इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) घटक पक्षांची बैठक बोलाविली आहे. परंतु, या बैठकीपूर्वीच घटक पक्षांच्या नेत्यांनी कॉंग्रेसला (Congress) डोळा दखविण्यास सुरुवात केली आहे. घटक पक्षांनी आता कॉंग्रेसवर (Congress) दबाव निर्माण करण्याच्या रणनितीवर काम करायला सुरुवात केली आहे. (I.N.D.I. Alliance)
(हेही वाचा – Abdul Sattar : संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांसाठी १७० कोटींची तरतूद; अब्दुल सत्तार यांची माहिती)
केजरीवालांची दांडी
दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) बैठकीला जराही महत्व न देत या बैठकीकडे पाठ फिरविली आहे. ते विपश्यनासाठी बंगलोरला जाणार आहेत. त्यांच्याऐवजी दिल्लीच्या मंत्री आतिशी या बैठकीला जाणार आहेत. परंतु, त्या फक्त बैठकीत उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्यावतीने कोणत्याही प्रकारचे आश्वासन किंवा भूमिका मांडण्याची मुभा केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्यांना दिली नसल्याचे समजते. (I.N.D.I. Alliance)
महत्वाचे म्हणजे, आघाडीतील घटक पक्ष मागील दोन बैठकांपासून जागावाटपावर चर्चा करण्याची मागणी कॉंग्रेसकडे (Congress) करीत होते. परंतु, कॉंग्रेस (Congress) त्यास तयार झाली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये सरकार येईल अशी कॉंग्रेसला (Congress) आशा होती. यानंतर घटक पक्षांना आपल्या मर्जीप्रमाणे वाकविता येईल असेही वाटत होते. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Elections) कॉंग्रेसचे पानीपत झाले. आता घटक पक्ष कॉंग्रेसला (Congress) दबावात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. (I.N.D.I. Alliance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community