शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्व आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण देणे बंधनकारक होते. तरीही मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. वेळेत निमंत्रण असते तर मी या कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र, आता निमंत्रण मिळालं तरी मी कार्यक्रमाला जाणार नाही, अशी नाराजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना निमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरून चर्चा चालू आहे.
(हेही वाचा – जंगली रम्मी आणि रम्मी सर्कल ॲप्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी Bombay High Court मध्ये जनहित याचिका दाखल)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी 12 वाजता जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीयल पार्कवर लखपती दीदी संमेलन पार पडणार आहे. मोदी सकाळी 10 वाजता छत्रपती संभजीनगर विमानतळावर दाखल होतील. जळगावात सकाळी 11.15 ते 12 या वेळेत ते बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते इंडस्ट्रीयल पार्कवरील कार्यक्रमस्थळी दाखल होतील.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडलेला नाही. अशात मोदींच्या कार्यक्रमाला न बोलावल्याने एकनाथ खडसे हे नक्की भाजपमध्ये जाणार की शरद पवार गटात? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community