चुकून जरी गोळी आली, तर आम्ही…Amit Shah यांचा पाकिस्तानला इशारा

जम्मू काश्मीर येथील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीर सभांचा सपाटा सुरू आहे.

76
लष्कराने सांगितले की आम्ही येथे बंकर बांधले आहेत, ते कधी ना कधी उपयोगी पडतील हे चांगले आहे, पण मी म्हणतोय की बंकरची गरज भासणार नाही, गोळीबार करण्याची ताकद कोणाकडे नाही. चुकूनही तिथून गोळी आली तरी गोळीला गोळीने उत्तर दिले जाईल, असा इशारच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिला.

तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही

जम्मू काश्मीर येथील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीर सभांचा सपाटा सुरू आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)  यांनी राजौरी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवर जोरदार निशाणा साधला. गृहमंत्री शाह म्हणाले की, आता जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येऊ शकत नाही. पाकिस्तानसोबतच्या चर्चेबाबत ते म्हणाले की, जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. राजौरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना गृहमंत्री शाह यांनी लोकांना विचारले की, कलम 370 हटवणे चांगले की वाईट. हे फारुख अब्दुल्ला म्हणतात की आम्ही कलम 370 परत आणू.
गृहमंत्री शाह (Amit Shah) म्हणाले की, अब्दुल्ला साहेब, तीन पिढ्या गेल्या, आता आणखी तीन आणा, आता कलम 370 कोणीही परत आणू शकत नाही.  पाकिस्तानशी चर्चा करा, फारुख साहेब, राहुल बाबा, आम्ही पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नाही. दहशतवाद संपेपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चेच्या बाजूने नाही. बोलायचंच असेल तर माझ्या नौशेराच्या सिंहांशी बोलू, पाकिस्तानशी का?

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.