Narendra Modi: केरळमध्ये जम्मू-काश्मीरपेक्षाही जास्त अत्याचार; दाक्षिणात्य कार्यकर्त्यांचं कौतुक करत मोदी म्हणाले…

दक्षिणेमध्ये एनडीएने एका नव्या राजकारणाचा पाया रोवला आहे.

182
Narendra Modi: ६० वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या सरकारने हॅटट्रिक केली, काशीत मोदी म्हणाले...
Narendra Modi: ६० वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या सरकारने हॅटट्रिक केली, काशीत मोदी म्हणाले...

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाली आहे. यावेळी संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाने गेल्या काही वर्षांत केलेल्या कामाबाबत वक्तव्य केलं आहे तसेच दक्षिणेतील कार्यकर्त्यांचं कौतुक केलं असून जम्मू-काश्मीरपेक्षा जास्त अत्याचार केरळमध्ये झालेले आहेत, असंही म्हटलं आहे.

दक्षिणेमध्ये एनडीएने एका नव्या राजकारणाचा पाया रोवला आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये लोकांनी एनडीएला पसंती दिली आहे. तमिळनाडूच्या टीमचे मी अभिनंदन करतो. त्यांनी जीव तोडून काम केलं. जागा जिंकलो नाही, पण एनडीएला मिळालेल्या मतामध्ये मोठी वाढ झाली आहे. केरळमध्ये आमच्या शेकडो कार्यकर्त्यांचं बलिदान गेलं आहे, असं मोदी म्हणाले.

(हेही वाचा – Mathura Tourist Places: तुम्ही मथुरेला जाताय? तर ‘हे’ नक्की वाचा)

केरळमध्ये पहिल्यांदा आमचा प्रतिनिधी निवडून आला
केरळमध्ये एका विचारधारेच्या लोकांवर झालेले अत्याचार भयंकर आहेत. मला वाटतं जम्मू-काश्मीरपेक्षा जास्त अत्याचार तिथे झाले आहेत. विजय कुठेही दिसत नव्हता, तरी कार्यकर्ते मागे हटले नाहीत. आज पहिल्यांदा तिथे आमचा प्रतिनिधी निवडून आला आहे. ही मोठी उपलब्धी आहे, असं मोदी म्हणाले. आंध्र प्रदेशमध्ये एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. इथे बसलेले पवन कल्याण हे पवन नाहीत तर ते एक वादळ आहेत. आंध्रच्या लोकांनी आमच्या बाजूने प्रचंड मतं दिली आहेत, असं मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी ओडिशाचादेखील उल्लेख केला. गरिबांचे देवता जगन्नाथ यांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे, असंही ते म्हणाले.

५ वर्षे ईव्हीएमवर विरोधक बोलणार नाहीत
ईव्हीएच्या मुद्द्यावरून विरोधक आता शांत झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा यावा यासाठी त्यांनी वारंवार कोर्टाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे निवडणूक आयोगाची शक्ती मोठ्या प्रमाणात यात खर्च झाली. विरोधकांना जगामध्ये देशाचं नाव खराब करायचं होतं, त्यामुळे त्याचं हे काम सुरू होतं; पण आता पुढील ५ वर्षे ईव्हीएमवर विरोधक बोलणार नाहीत, असं मोदी म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.