Uddhav Thackeray यांनी हिंदुत्व सोडल्याची काही उदाहरणे!

94
Uddhav Thackeray यांनी हिंदुत्व सोडल्याची काही उदाहरणे!
  • खास प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्यापासून शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेहमीच ‘आपण हिंदुत्व सोडलेले नाही’ असा दावा करताना दिसतात. तसाच दावा ठाकरे त्यांनी शुक्रवारी ७ फेब्रुवारी या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील एका कार्यक्रमात केला आणि ‘हिंदुत्व सोडले यांचे एक तरी उदाहरण द्या’, असे आव्हान दिले.

(हेही वाचा – अरविंद केजरीवालांच्या नौटंकीची दिल्लीच्या जनतेकडून चिरफाड; Pravin Darekar यांचा प्रहार)

बाळासाहेबांचे हिंदुत्व शिंदेंकडे

ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्व सोडल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र ठाकरे यांनी शिवसेना उबाठाच्या कार्यक्रमात भाषण केल्याने त्यांनी हिंदुत्व सोडले, असे म्हणण्याची हिम्मत उघडपणे कोणी करत नाही. खाजगीत शिवसेना उबाठा कार्यकर्तेच मान्य करतात की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्व सोडल्याने मराठी आणि हिंदू मते विधानसभेला दूर गेली. तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा पुढे नेल्याने त्यांच्या पारड्यात उबाठापेक्षा अधिक मते पडली.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाचे २० आमदार निवडून आले तर शिवसेना (शिंदे) यांचे ५७ आमदार विधानसभेत पोहोचले. शिवसेना एकसंघ असतानाही शिवसेनेचे २०१९ मध्ये ५६ उमेदवार निवडून आले होते त्यापेक्षा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकने संख्या वाढली.

(हेही वाचा – Bandra Sewage Treatment Plant : प्रकल्पाच्या आड येणाऱ्या २६५ झाडांचे केले पुनर्रोपण)

ही घ्या उदाहरणे…
  • ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्व सोडले यांचे पहिले उदाहरण म्हणजे भाषणाची सुरुवात ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ असे करणे सोडून दिले. विशेष म्हणजे त्यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यानंतर हा फरक पडला.
  • लोकसभा निवडणुकीत काही मतदार संघात शिवसेना उबाठा उमेदवारांना मुस्लिमबहुल विभागात अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झाल्याने मुस्लिम मतदारांना उबाठा जवळचा पक्ष वाटू लागला, याचे कारण उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, असा विश्वास मुस्लिम मतदारांमध्ये बळावला.
  • २०१९ मध्ये ‘मंदिर वही बनाएंगे पर तारीख नही बताएंगे’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. राम मंदिर बांधून वर्ष झाले, लाखों रामभक्तांनी अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेतले पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेल्याचे ऐकिवात नाही. हे हिंदुत्व सोडल्याचे लक्षण नाही का? असा सवाल केला जात आहे.
  • लोकसभा निवडणूक काळात ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ अशा आशयाचे पोस्टर्स काही ठिकाणी झळकत होते, जे यापूर्वी कधीच दिसले नव्हते.
  • अशा प्रकारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्व सोडल्याची अनेक उदाहरणे असूनही एक उदाहरण द्या, असे आव्हान ठाकरे कसे देऊ शकतात, याबाबत शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम निर्माण होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.