प्रत्येक हिंदूने त्यांच्या खिशातील पैसा हिंदूच्याच खिशात टाकावा; Ranjit Savarkar यांचे आवाहन 

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहकार्याने आयोजित 'मी सावरकर' या वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

47

प्रत्येक हिंदूने आज हे मनाशी पक्के करायची वेळ आली आहे की, माझ्या खिशातील प्रत्येक पैसा हा माझ्याच माणसाच्या म्हणजे हिंदूच्या खिशात कसा जाईल. याची सर्व हिंदूंनी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले.

हिंदूंनी वरील प्रकारची नीती स्वीकारली तर हिंदूंचा आर्थिक उत्कर्ष होईल. याकरता उपाय म्हणजे ॐ प्रमाणपत्र प्राप्त व्यावसायिकांकडूनच आपल्या हवा असलेला माल किंवा सेवा घ्यायला सुरुवात केली पाहिजे, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बुद्धिनिष्ठ आणि व्यावहारिकता हे विचार आपल्यात उतरले पाहिजेत, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहकार्याने आयोजित ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. आगरकर रस्त्यावरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वा. सावरकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर, संयोजन समितीचे धनंजय बर्वे, अमेय कुंटे, प्रवीण गोखले, रवी ढवळीकर उपस्थित होते.

(हेही वाचा भट्टी बंद म्हणून Tandoor Bakery ला मिळणार गॅससाठी अनुदान; परवान्याच्या नुतनीकरणाचीही नसेल गरज)

हिंदू संघटन करण्यासाठी राजकीय हिंदुत्व प्रबळ करावे – माजी खासदार रावत   

हिंदू समाज हा वैश्विक समाज बनला आहे. परंतु नैतिकदष्ट्या देखील तो उन्नत व्हायला हवा. हिंद समाजात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चारित्र्य आणि विचार हाणून पाडण्याचा प्रयत्न सतत चालू असतो, परंतु त्यांचा विचार आज राष्ट्रीय विचार झाला आहे. त्यांच्या विचारांचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. ‘सकल हिंदू बंधू बंधू’ हा त्यांचा विचार जोपर्यंत रुजणार नाही, तोपर्यंत हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाला ठोसपणा येणार नाही. हिंदू संघटन करायचे असेल तर राजकीय हिंदुत्व प्रबळ करावे लागेल, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.

यावेळी सात्यकी सावरकर म्हणाले, जे सावरकरांना भित्रा म्हणत होते, तेच सावरकर या नावाला आज घाबरत आहेत. संविधानाची प्रत हातात घेऊन सावरकरांची अपकीर्ती करणारे आज न्यायालयात येण्यास देखील घाबरत आहेत. मात्र त्यांच्या विरोधात शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.