फडणवीसांच्या पुराव्यांची सत्यता पडताळणार! गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती

117

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करून दिलेल्या पुराव्याची सत्यता पडताळण्याचे काम गृह विभागाकडून चालू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील यांनी ९ मार्च या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना दिली.

कॅमेरा कोणी लावला?

ते पुढे म्हणाले की, विशेष सरकारी अधिवक्ता यांच्या कार्यालयात अथवा घरात लावण्यात आलेला कॅमेरा कोणी लावला? कॅमेरा लावण्यामागचे उद्दिष्ट काय होते? याविषयी चौकशी केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारवर एवढा गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे, मात्र आरोप करतांना १ बोट सरकारकडे असले, तरी उरलेली ४ बोटे भाजपकडे आहेत. यापूर्वीही ‘फोन टॅपिंग’ करून काही नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला गेला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे ही प्रकरणे बाहेर येत आहेत, असेही मंत्री पाटील म्हणाले.

(हेही वाचा महाराष्ट्र भाजप संपवण्याची काय होती टूलकीट? देवेंद्र फडणवीसांचा पुराव्यांसह गौप्यस्फोट)

काय म्हणाले फडणवीस?

सरकारी वकील प्रविण चव्हाण हे ठाकरे सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र भाजपातील प्रमुख नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवाचये आणि त्यांना अटक करायचे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुंगटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, चंद्रकांत बावनकुळे यांना टार्गेट करायचे, अशा प्रकारचे टूलकीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी विधानसभेत उघड केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.