EVM-VVPAT : महाराष्ट्रातील ‘या’ ८ मतदारसंघातील ईव्हीएमचा होणार तपास; उमेदवारांनी केला ईव्हीएम-व्हीव्हीपॅट तपासणीसाठी अर्ज

151
EVM-VVPAT : महाराष्ट्रातील 'या' ८ मतदारसंघातील ईव्हीएमचा होणार तपास; उमेदवारांनी केला ईव्हीएम-व्हीव्हीपॅट तपासणीसाठी अर्ज

महाराष्ट्रासह देशातील अन्य मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीचा निकाल अपेक्षेच्या विरोधात आल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. (EVM-VVPAT)

मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाचा वाद लवकरच न्यायालयाच्या दारात पोहोचल्याचे बघायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर ५८ मतांनी विजयी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वायकर यांच्या विजयाला आव्हान देण्याचे ठरविले आहे. उद्धव सेनेचे अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते; परंतु कारस्थान रचून वायकर यांना विजयी करण्यात आले, असा उद्धव सेनेचा आरोप आहे. हे प्रकरण लवकरच न्यायालयात जाणार आहे. (EVM-VVPAT)

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर केवळ विरोधी पक्षांना शंका आहे, असे अजिबात नाही. तर भाजपाच्या नेत्यांनाही निकालावर शंका आहे. अहमदनगर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासह देशातील विविध पक्षाच्या उमेदवारांनी निकालावर शंका घेतली आहे. सुजय विखे पाटील यांनी आयोगाकडे अर्ज करून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची जुळवणी करण्याची विनंती केली आहे. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील यांनी क्षेत्रनिहाय ईव्हीएम युनिटची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (EVM-VVPAT)

लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जवळपास डझनभर उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करून EVM-VVPAT तपासण्याची मागणी केली आहे. यामध्ये भाजपाच्या उमेदवारांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे. त्यांच्या अर्जांमध्ये, या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (EVM-VVPAT) युनिटचे मेमरी पडताळणी तपशील मागितले आहेत. (EVM-VVPAT)

(हेही वाचा – India’s Home Series : २०२४-२५ हंगामात भारत इंग्लंड, न्यूझीलंड बरोबर खेळणार मायदेशात कसोटी मालिका)

मतदारसंघनिहाय ईव्हीएम युनिटची चौकशी

सुजय पाटील यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम युनिटची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांनी त्यांचा २८,९२९ मतांनी पराभव केला. या संदर्भात सुजय पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु चर्चा होऊ शकली नाही. महाराष्ट्रानंतर ओडिशातील झारसुगुडा मतदारसंघातील बिजू जनता दलाच्या उमेदवार दीपाली दास यांनीही अशीच मागणी केली आहे. त्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या टंकधर त्रिपाठी यांच्याकडून १,२६५ मतांनी पराभूत झाल्या. दास या जागेवरून अनेकदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी सुमारे डझनभर ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी मशीनची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दास यांच्यानुसार, एकूण १९फेऱ्यांपैकी त्या १७व्या फेरीपर्यंत आघाडीवर होत्या. पण अचानक शेवटच्या आणि पुढच्या दोन फेऱ्यांमध्ये मागे पडल्या. ही बाब त्यांना पचली नाही. यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे १३ मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्ये भाजपाने क्लीन स्वीप केला आहे, अशा एकही अर्ज आयोगाला मिळालेला नाही. (EVM-VVPAT)

फक्त ५ टक्के ईव्हीएम मशीन तपासता येणार…

लोकसभा निवडणुकीदरम्यान २६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व EVM-VVPAT स्लिप जुळवण्याची याचिका फेटाळताना कुणाला काही शंका असेल तर त्यांनी मतमोजणीनंतर सात दिवसांच्या आत अर्ज करावा, असे म्हटले होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ५ टक्के ईव्हीएम मशीन तपासता येतील. हा अर्ज केवळ उपविजेते आणि द्वितीय उपविजेतेच दाखल करू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले होते. (EVM-VVPAT)

ईव्हीएममध्ये दोष आढळल्यास…

आयोगाच्याच सूचनांमध्ये ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी ४० हजार रुपये आणि जीएसटी भरावा लागेल, असे म्हटले होते. पडताळणीदरम्यान ईव्हीएममध्ये काही दोष आढळल्यास ही रक्कम उमेदवारांना परत केली जाईल. (EVM-VVPAT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.