भारताचे पहिले गव्हर्नर राजगोपालाचारी यांचे पणतू सी.आर. केशवन यांचा भाजपमध्ये प्रवेश

108

भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे पणतू सी.आर. केशवन यांनी  शनिवारी भाजपमध्ये प्रवेश घेतला. ए.के. अँथोनी यांचे सुपुत्र अनिल अँथोनी, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्यापाठोपाठ सी.आर. केशवन यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे दक्षिण भारतात काँग्रेसला तिसरा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सी. आर. केशवन गेल्या २२ वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही सामील झाले नव्हते. मोदी सरकारकडे सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणे, द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला विरोध करणे अशी विविध कारणे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना सांगितली होती. आता ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. सी.आर. केशवन यांचे पणजोबा सी. राजगोपालाचारी यांचे देखील जवाहरलाल नेहरुंशी मतभेद झाल्यानंतर १९५९ मध्ये त्यांनी स्वतंत्र पार्टी नामक राजकीय पक्ष स्थापन केला होता. स्वतंत्र पार्टी पक्षाचे त्याकाळी ४१ खासदार निवडून आले होते. त्यामुळे तो प्रमुख विरोधी पक्ष ठरला होता.

(हेही वाचा – नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मविआचे सरकार पडले – आशिष देशमुख)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.