महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि आपच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांच्या माजी पतिकडून करण्यात आला आहे. खरं तर हा अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्यात आला असल्याची चर्चा राजधानीत रंगली आहे. मालीवाल यांचे माजी पती नवीन जयहिंद यांनी दावा केला आहे की स्वातींच्या जीवाला धोका आहे. स्वातींसोबत जे काही घडले ते नियोजित होते. स्वातीने पुढे येऊन आपली बाजू मांडावी, असे नवीन म्हणाले. (AAP)
याशिवाय ते आपचे (AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्याबद्दल म्हणाले, ‘मी संजय सिंह यांची पत्रकार परिषद ऐकत होतो आणि मला त्यांना सांगायचे आहे की त्यांनी कॅमेऱ्यासमोर अभिनय करणे थांबवावे, कारण त्यांना संपूर्ण प्रकरण माहित होते.’ खरं तर, संजय सिंह यांनी मंगळवारी (१४ मे) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांच्यासोबत असभ्य वर्तन झाल्याची कबुली दिली होती. त्यांनी मीडियाला सांगितले – १३ मे रोजी एक अत्यंत निंदनीय घटना घडली. स्वाती मालीवाल सकाळी अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. ड्रॉईंग रूममध्ये केजरीवालांची वाट पाहत होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे पीए बिभव कुमार तेथे पोहोचले आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले. (AAP)
(हेही वाचा – Bansuri Swaraj आणि Kanhaiya Kumar यांच्यात सोशल मीडियावर जोरदार खडाजंगी, मनोज तिवारीलाही लाखो व्ह्यूज)
संजय सिंह म्हणाले- दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे. याप्रकरणी ते कठोर कारवाई करतील. स्वाती मालीवाल यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांनी देश आणि समाजासाठी खूप काही केले आहे. त्या ज्येष्ठ आणि जुन्या नेत्यांपैकी एक आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. (AAP)
नवीन जयहिंद यांनी मंगळवारी संध्याकाळी X वर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आणि सांगितले की मला या घटनेबद्दल विचारणारे अनेक कॉल येत आहेत. सर्वप्रथम, मी स्वातीपासून घटस्फोट घेतला आहे. गेली चार वर्षे मी तिच्या संपर्कात नाही. दुसरे म्हणजे, स्वातीसोबत जे काही घडले त्याचे आधीच नियोजन होते आणि आता तिला धमकावले जात आहे. स्वातीसोबत काहीही होऊ शकते. स्वातीसोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला आवाज उठवण्याचीही हिंमत नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याने हे सर्व केले आहे. स्वातीनेही पुढे येऊन आपले मत मांडले पाहिजे. तिला कशाची भीती वाटते? आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. तिचा जीव धोक्यात आहे. (AAP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community