Tanaji Sawant यांचा मुलगा नाट्यमय घडामोडीनंतर परतला; नेमंक प्रकरण काय?

93
Tanaji Sawant यांचा मुलगा नाट्यमय घडामोडीनंतर परतला; नेमंक प्रकरण काय?
Tanaji Sawant यांचा मुलगा नाट्यमय घडामोडीनंतर परतला; नेमंक प्रकरण काय?

माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुण्यातील सिंहगड रोड (Sinhgad Road) पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाची तक्रार देण्यात आली होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत (rushiraj sawant) हे एका स्विफ्ट गाडीत बसून विमानतळावर आले आणि त्यानंतर ऋषिराज बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. या सगळ्यात सावंतांनी थेट पोलिस आयुक्तांचे कार्यालय गाठून पत्रकार परिषद घेतली. मात्र दुसरीकडे रात्री ९.३० च्या सुमारास ऋषिराज सावंत पोलिसांच्या साहय्याने पुणे विमानतळावर सुखरूप परतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

( हेही वाचा :  पंतप्रधानांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया; म्हणाले, मोदींशी निवडणुकीपुरते नाही…

पोलिसांनी याप्रकरणी सांगितले की, ऋषिराज सावंत आणि त्यांच्या दोन मित्रांना बँकॉकहून (Bangkok) पुन्हा पुण्यात आणले आहे. ते पुण्यातून बँकॉकच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुळात सावंत यांच्या कुटुंबियांना कोणत्याच प्रकारची माहिती नसल्याने त्यांनी आयुक्तालयात धाव घेतलीय. त्यातच पोलिसांनाही ऋषिराज सावंत (rushiraj sawant) यांचे अपहरण झाल्याचे माहिती असल्याने पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. तरी पोलीस आता ऋषिराज सावंत (rushiraj sawant) कुटुंबियांना सांगून अचानक असे का जात होते, याची चौकशी करणार आहेत.

दरम्यान तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले की, हे बेपत्ता आहे की अपहरण याबद्दल आम्हाला नेमकं माहित नाही. त्यांच्यासोबत जे होते ते त्याचे मित्र होते, त्याच्या गाडीतून जाण्याच्या ऐवजी त्याच्या मित्राच्या गाडीतून तो गेला. तसेच कुठे जात आहे याची माहिती मला नसल्याने मी काळजीमुळे लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. फोन केल्याशिवाय तो कुठेही जात नाही, मात्र आज तसे झाले म्हणून मी पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच याबद्दल माहिती मला आमच्या चालकाकडून मिळाली की मी त्यांना विमानतळावर सोडून आलो. पण मला याची कल्पना नव्हती म्हणून मी पोलिसांशी संपर्क साधला, असे सावंत म्हणाले आहेत. तसेच कोणत्याही प्रकरचा कौटुंबिक वाद झाला नसल्याचे ही सावंत म्हणाले. त्यामुळे तपासानंतरच प्रकरणाची अधिक माहिती मिळेल. (rushiraj sawant)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.