माजी मंत्र्यांना अजूनही सरकारी बंगल्यांचा मोह सोडवेना; भुजबळ,आव्हाडांसह अनेक नेते सरकारी बंगल्यातच

महाविकास आघाडी सरकार (मविआ) कोसळून महिना उलटला तरीही मविआ सरकारमधील अनेक मंत्र्यांनी सरकारी बंगले सोडलेले नाहीत. मविआ सरकारमधील 40 मंत्र्यांपैकी केवळ 18 मंत्र्यांनी सरकारी बंगला सोडल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले. आमदार गेल्याने, सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी आपला मुक्काम वर्षा या शासकीय बंगल्यातून हलवला. राज्यात सत्तापालट होऊन महिना उलटला तरीही अद्याप माजी 22 मंत्र्यांनी सरकारी बंगला सोडलेला नाही.

मंत्रीमंडळ बरखास्त झाल्यानंतर, 15 दिवसांच्या कालावधीत हे बंगले रिक्त करावे लागतात. मात्र ठाकरे सरकार पायउतार होऊन महिना उलटला आहे. राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांसाठी मंत्रालय परिसरात, मलबार हिल आणि आमदार निवास येथील बंगल्यांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात येते. माजी मंत्र्यांनी बंगले सोडले नसल्याने, भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

( हेही वाचा: MSRTC : घरातील सामान शिफ्ट करायचंय? मालवाहतुकीसाठी धावतेय एसटी! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here