विवेक पाटलांना २५ जूनपर्यंत ईडी कोठडी!

कर्नाळा नागरिक बँकेचे संस्थापक असणारे माजी आमदार विवेक पाटील यांच्या बँकेत ५१२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या चौकशीत समोर आले होते.

137

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी, १५ जून रोजी ईडीने अटक केलेले माजी आमदार विवेक पाटील यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. ईडीने विवेक पाटील यांच्या विरोधातील पुरावे न्यायालयात हजर करून त्यांच्यावर बोगस खाते उघडून कोट्यवधींचे कर्ज दिल्याचे दाखवण्यात आले असल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला आहे. या दरम्यान न्यायालयाने विवेक पाटील यांना २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बँकेत ५१२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार!

कर्नाळा नागरिक बँकेचे संस्थापक असणारे माजी आमदार विवेक पाटील यांच्या बँकेत ५१२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या चौकशीत समोर आले होते. ६३ व्यक्तींना कर्ज देण्यात आले होते, मात्र हे ६३ कर्जदार कोण आहे, याबाबत संशय निर्माण झाला होता. या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ईडीने हाती घेऊन चौकशी सुरू केली होती, या चौकशीदरम्यान ईडीच्या हाती लागलेल्या महत्वाच्या पुराव्यावरून मंगळवारी बँकेचे संस्थापक आणि माजी आमदार विवेक पाटील यांनी त्यांच्या पनवेल येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा : जेव्हा ‘बाप’ होतो ‘सैतान’, तेव्हा…)

पाटलांनी पदाचा गैरवापर करत बोगस कर्जाद्वारे पैसे मिळवले!

६३ खात्यावर देण्यात आलेले कर्ज हे दोन खात्यावर वळवण्यात आले होते. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या खात्यावर पैसे वळवण्यात आले होते. या अकॅडेमी आणि ट्रस्टचे अध्यक्ष देखील विवेक पाटील हेच आहेत. पाटील यांनी पदाचा गैरवापर करून खातेदारांचे पैसे बोगस कर्जाद्वारे आपल्या संस्थांच्या खात्यावर मिळवले होते. या सर्व बाबी ईडीच्या तपासात उघड झाल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती ईडी अधिकाऱ्यांनी ईडीने न्यायालयात दिली. दरम्यान विवेक पाटील यांना न्यायालयाने २५ जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.