#Exclusive उद्धव गटाच्या आमदारांना तूर्त जीवदान; शिवसेना ‘व्हीप’ बजावणार नाही!

210

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आल्यानंतर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हीप बजावून उद्धव सेनेच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तूर्त अशाप्रकारची कोणतीही कारवाई करणार नसल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली.

( हेही वाचा : अभ्यासाच्या तणावामुळे बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या! पनवेलमधील धक्कादायक घटना)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा ताबा एकनाथ शिंदे गटाकडे आला आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांना शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप पाळावा लागणार आहे. मात्र, गोगावले यांचा व्हीप न पाळण्यावर उद्धवसेना ठाम आहे. अशा स्थितीत ठाकरेंकडे उरलेल्या सर्व आमदारांना अपात्र ठरविण्याची नामी संधी एकनाथ शिंदेंकडे आहे.

मात्र, ‘व्हीप’ अस्त्र वापरून उद्धव ठाकरेंना जर्जर करण्याऐवजी शिवसेनेने सध्या नरमाईची भूमिका स्वीकारण्याचे ठरवले आहे. कारण ठाकरे गट सध्या सहानुभूतीची लाट निर्माण करण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. त्यांचा हा प्रयत्न सफल होऊ नये, यासाठी शिवसेना सावध पावले टाकणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून तूर्त व्हीप बजावला जाणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सध्या फक्त ‘हवा’ करणार

शिवसेनेचे नेते व्हीप संदर्भात दररोज प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे उद्धव सेनेच्या गोटात चलबिचलता वाढली आहे. मात्र, व्हीपच्या चर्चा केवळ वातावरण निर्मितीसाठी केल्या जात असून, शिवसेना तूर्त तरी उद्धव गटावर कारवाई करण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात आले.

मग कधी व्हीप बजावणार?

लोकांच्या हिताचा प्रश्न किंवा विधेयक सभागृहात आले असेल, आणि महाविकास आघाडी त्याला विरोध करीत असेल, अशा स्थितीत लोकहितासाठी व्हीप बजावला जाऊ शकतो. अन्यथा शिंदेंची टीम व्हीप बजावणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.