Exit Poll Ban : महाराष्ट्रासह इतर राज्यातील निवडणुकांवरील एक्झिट पोलवर बंदी, काय कारण आहे?

130
Exit Poll Ban : महाराष्ट्रासह इतर राज्यातील निवडणुकांवरील एक्झिट पोलवर बंदी, काय कारण आहे?
Exit Poll Ban : महाराष्ट्रासह इतर राज्यातील निवडणुकांवरील एक्झिट पोलवर बंदी, काय कारण आहे?

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर देशात राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. भाजपा, काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. दरम्यान, महाराष्ट्र आणि झारखंड (Jharkhand Assembly Election 2024) या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांदरम्यान एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने गुरुवारी आदेश जारी केले आहेत. (Exit Poll Ban)

दरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०६:३० वाजेपर्यंत प्रिंट मीडिया किंवा टीव्ही मीडियामध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल छापण्यास किंवा प्रसारित करता येणार नाहीत, असे निर्देश निवडणूक आयोगांमार्फत देण्यात आले आहेत. या काळात प्रसारमाध्यमे मतदानावर परिणाम करणारे कोणतेही चुकीचे चित्रण प्रसारित करू शकत नाहीत. तसेच निवडणुकांवर कोणत्याही प्रकारे चुकीचा प्रभाव पडू नये यासाठी निवडणूक आयोग (Election Commission) अत्यंत दक्ष आहे. 

(हेही वाचा – Zomato Platform Fee : झोमॅटोवरून अन्नपदार्थ मागवणं होणार महाग, किती महाग जाणून घ्या)

ऑक्टोबर १५ रोजी निवडणूक आयोगाने झारखंड आणि महाराष्ट्र राज्यांच्या विधानसभा निवडणूक घेण्याची घोषणा जारी केली होती. महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांसाठी १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर रोजी सर्व निवडणूक होणार आहेत. या निवडणूक महाराष्ट्र, झारखंड, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये होणार आहेत. या सर्व राज्यांसाठी मतदान झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.