Exit Poll Results 2024: एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ‘या’ पक्षाचे पारडे होणार जड 

362
Exit Poll Results 2024: एक्जिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ‘या’ पक्षाचे पारडे होणार जड 

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, येत्या 4 जून रोजी या मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत. देशात सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. हे मतदान संपत असताना सर्व मतदारांना उत्सुकता लागून राहिली आहे तसेच विविध समाजमाध्यम आणि संस्थांच्या एक्जिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ‘टीव्ही ९’ (TV 9) आणि ‘एबीपी सी व्होटर’ (ABP C Voter) यांच्या पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि माविआला निम्म्या जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Exit Poll Results 2024)

ABP-C-Voterचा एक्झिट पोल काय?

यापैकी ABP-C-Voter देखील आपले सी-व्होटर जाहीर केले आहेत. त्यात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात मविआला 23 जागा मिळतील तर महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकाच जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.

(हेही वाचा – राज्यात महायुतीला ३०, महाविकास आघाडीला १८ जागा, दोन केंद्रीय मंत्री पराभूत; ‘हिंदुस्थान पोस्ट’चा Exit Poll)

टीव्ही 9 नुसार – महायुतीला 22, मविआ-25

TV9 मराठीच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 22 आणि अपक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी सर्वाधिक 25 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येण्याची शक्यकता आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली. या फुटीचा मोठा फटका महायुतीला बसल्याचा अंदाज एक्झिट पोलची आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रात कोणत्या पक्षांनी किती जागा लढल्या?

राज्यात यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानापूर्वी एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीला 18 तर महायुतीला 30 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.

महायुती

* भाजप – 28

* एकनाथ शिंदे – 15

* अजित पवार – 4

* महादेव जानकर – 1

महाविकास आघाडी

* उद्धव ठाकरे गट – 21

* काँग्रेस – 17

* शरद पवार – 10

(हेही वाचा –  Hindutva : आता हिंदुत्व हाच ध्यास आणि श्वास; सेवानिवृत्तीनंतर राजेंद्र वराडकर यांनी व्यक्त केल्या भावना)

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार?

मविआ- 23 ते 25

महायुती – 22 ते 26

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात 41 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, आता आकडा 26 जागांपर्यंत खाली आल्यास हा भाजपप्रणित NDA आघाडीसाठी मोठा धक्का ठरेल. या 26 जागांमध्ये भाजपचे किती उमेदवार असणार, हे पाहावे लागेल. यापैकी बहुतांश उमेदवार भाजपचे असल्यास शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटामुळे फारसा फायदा झाला नसल्याचे स्पष्ट होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.