BRICS : ब्रिक्सचा विस्तार, आता ‘या’ सहा देशांचा समावेश

146

BRICS देशांचे दक्षिण आफ्रिकेत संमेलन सुरु आहे. या संमेलनामध्ये मोठी घोषणा करण्यात आली. या BRICS ची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

ब्रिक्समध्ये इराण, अर्जेंटिना, इथिओपिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया समावेश करण्यात आला असून, या संघटनेचे नामकरण ब्रिक्स प्लस असे करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या  ब्रिक्स परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा यांनी ही घोषणा केली आहे. याआधी ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश होता. त्या देशांच्या अद्याक्षरांवरूनच संघटनेला ब्रिक्स असे नाव देण्यात आले होते. मात्र आता यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश झाल्याने ब्रिक्स संघटनेतील सदस्य देशांची संख्या ११ झाली आहे. रामफोसा यांनी सांगितले की, ब्रिक्सच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्याला आमची सहमती आहे. तसेच इतर टप्पे यानंतर पार पडतील. सध्या आम्ही अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीला ब्रिक्सचे पूर्ण सदस्य बनण्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे देश १ जानेवारीपासून संघटनेचे सदस्य बनतील.

(हेही वाचा Chandrayaan – 3 मोहिमेच्या यशाचे Googleनेही डुडल द्वारे केले अभिनंदन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.