मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी काँग्रेस नेत्यांची विधाने धोकादायक आहेत. हा हल्ला पाकिस्तानने घडवून आणला हे न्यायालयात सिद्ध झाले, जगाने मान्य केले, एवढेच नव्हे तर खुद्द पाकिस्ताननेही मान्य केले आहे. असे असूनही काँग्रेसचे नेते पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याची बाजू घेत आहेत. या मुंबई हल्ल्यातील मृतांचा आणि हुतात्म्यांचा अपमान आहे. अशा काँग्रेस आघाडीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकही जागा मिळता कामा नये, असा घाणाघात हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नगरमध्ये केला.
(हेही वाचा Arvind Kejriwal यांना दुहेरी झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, २० मेपर्यंत कोठडी)
४ जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी डेट
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मोदी मंगळवारी, ७ मे रोजी नगरला आले होते. येत्या चार जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी डेट ठरली आहे. त्यानंतर त्यांचा झेंडा घ्यायलाही माणूस शिल्लक राहणार नाही. ही लढाई संतुष्टीकरण विरूद्ध तुष्टीकरण अशी आहे. आम्हाला देशातील नागिरकांना संतुष्ट करायचे आहे तर इंडी आघाडीला त्यांच्या वोट बँकेचे तुष्टीकरण करायचे आहे. म्हणूनच काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीम लीगशी मिळता जुळता आहे. चारा घोटाळ्याच्या आरोपातून अलीकडेच तुरुंगातून बाहेर आलेल्या बिहारमधील इंडी आघाडीतील नेत्याने प्रसार माध्यमांसमोर बोलताना एका मोठ्या कटाची माहिती दिली आहे. त्या नेत्याने सांगितले की, आम्हाला मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण द्यायचे आहे. आमचे केंद्रात सरकार आल्यावर ते देणार आहोत. सध्या संपूर्ण आरक्षण एस.सी.एस.टी., ओबीसी अशा घटकांना आहे. अनेक प्रयत्न करूनही हे घटक काँग्रेसला जोडले जात नाही. त्यामुळे आता काँग्रेस आघाडीने त्यांच्या आरक्षण हिसकावून घेऊन ते मुस्लिमांना देण्याचा कट रचला आहे. ज्या गोष्टीला खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता, तीच गोष्ट आता ही मंडळी त्यांच्या मतबँकेसाठी करीत आहेत, त्यासाठी त्यांना राज्य घटना बदलायची आहे. त्यांना लोकांनी नाकारले आहे. त्यामुळे इंडी आघाडी हताश झाली आहे. मात्र, सीमापार असलेली त्यांची बी टीम ट्विटच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देत आहे, असा आरोपीही मोदी (PM Narendra Modi) यांनी केला.