जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. पंतप्रधानांच्या दिशेने पाईपसारखी वस्तू फेकण्यात आल्यानंतर हा स्फोट झाला. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधान किशिदा यांना सुखरूप बाहेर काढले आहे. दरम्यान याप्रकरणी पश्चिम जपानच्या वाकायामा बंदरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
( हेही वाचा : “या गोष्टी त्वरित थांबवा…अन्यथा करणार कायदेशीर कारवाई”, व्हायरल व्हिडिओप्रकरणी खासदार राहुल शेवाळेंनी दिला इशारा )
पंतप्रधानांचे भाषण सुरू होण्यापूर्वी स्फोट
फुमियो किशिदा यांच्या सभेतील या घटनेचा व्हिडिओ स्थानिक वृत्तवाहिनीने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत वाकायामा येथे जमलेले मीडिया कर्मचारी आणि इतर लोक भीषण स्फोट झाल्यानंतर धावताना दिसत आहेत. एकूण 19 सेकंदाच्या फुटेजमध्ये मीडियाचे कर्मचारी आणि इतर लोक तिथून पळताना दिसत आहेत. या भीषण बॉम्ब स्फोटानंतर सर्वत्र धूर पसरला होता. घटनास्थळी स्फोटासारखा आवाज ऐकू आला. पंतप्रधान फुमियो किशिदा यांना लगेचच सुरक्षा रक्षकांनी झाकून घेतले. घटनास्थळी जमलेले लोकही इकडे-तिकडे धावू लागले. पंतप्रधान त्यांचे भाषण सुरू करणार होते त्यापूर्वीच वाकायामा शहरात स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community