महाविकास आघाडी सरकारच्या काळातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न चांगलाच वादात राहिला. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यादरम्यानच राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्राबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी गौप्यस्फोट केला. तसंच १२ आमदार नियुक्ती पत्रावर सही का केली नाही? याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
पत्रात धमकीची भाषा
एका खासगी मराठी वृत्तसंकेतस्थळासोबत बोलताना तत्कालीन भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, १२ आमदार नियुक्त्यांच्याबाबत मला महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं येऊन पत्र दिलं. हे पाच पानांचं पत्र होत. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण त्या पाच पानांच्या पत्रात राजपालांना तुम्ही धमकी देताय आणि सांगतायत, हे कायदे, ते कायदे. आणि शेवटी लिहिलंय, १५ दिवसांत नियुक्त्या करा. मुख्यमंत्री राज्यपालांना असं सांगू शकतात, हे कुठल्या संविधानात लिहिलंय? कुठल्या घटनेत तसं लिहिलंय?, असा प्रतिसवालच कोश्यारींनी केला.
पत्राच्या दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांच्या नियुक्त्या करणार होते कोश्यारी
पुढे कोश्यारी म्हणाले, ‘जेव्हा ते पत्र पुन्हा कधी समोर येईल, तेव्हा त्यात काय सत्य आहे, त्याचा उलगडा होईलच. मात्र त्या पत्राच्या दुसऱ्याच दिवशी मी नियुक्त्या करणार होतो. पण अशा प्रकारे तुम्ही पत्र लिहिता, ज्यात धमकीची भाषा असते. त्यामुळे मी पत्रावर सहीच केली नाही.’
(हेही वाचा – Prakash Ambedkar: …तर आम्ही पुन्हा एकटे; प्रकाश आंबेडकरांचा थेट ठाकरे गटाला सूचक इशारा)
‘माझे मविआसोबत संबंध चांगले होते, पण त्यांचे सल्लागार कोण होते? त्यांचे आमदार माझ्याकडे येऊन, आम्हा वाचवा, आम्हा वाचवा असं म्हणत होते. उद्धव ठाकरे तर शकुनीमामाच्या फेऱ्यात अडकले. त्यांचा शकुनीमामा कोण होता काय माहित?’, असं कोश्यारी म्हणाले.
Join Our WhatsApp Community