Shivsena UBT मधील ३ नेत्यांची हकालपट्टी; पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठेवला ठपका

283

आधीच गळती, त्यात हकालपट्टी! कोकणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाला मोठे धक्के बसत आहेत. ठाकरे गटातून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची रिघ लागली आहे. त्यात नुकतेच कोकणातील माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे कोकणात (Konkan) शिवसेना उबाठा गटाला फटका बसला आहे. यातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कोकणतील ३ बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Shivsena UBT)

कुणाकुणाची झाली गच्छंती?

रत्नागिरी जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक (Rajendra Mahadik), जिल्हाप्रमुख विलास चाळके (Vilas Chalke), चिपळून – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रोहन बने (Rohan Bane) यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे, असे यासंबंधीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा – NICB मध्ये १२२ कोटी रुपयांचा बँक घोटाळा; बँकेच्या महाव्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल)

ठाकरे गटाच्या 150 हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

दुसरीकडे, हकालपट्टी करण्यात आलेले विलास चाळके व राजेंद्र महाडिक हे दोन नेते शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांनी ही माहिती दिली आहे. उबाठातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. त्यापैकी काहींचा शनिवारी पक्षप्रवेश होत आहे. माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व जिल्हाप्रमुख विलास चाळके हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शनिवारी प्रवेश करणाऱ्यांची यादीत वाचत बसलो तर एकनाथ शिंदे साहेब येथे लँड होतील. उबाठा गटाचे 150 हून अधिक पदाधिकारी शनिवारी शिवसेनेत येत आहेत, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – pm salary in india : भारतामध्ये पंतप्रधानांना किती मिळतो पगार?)

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना वाढावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. केवळ रत्नागिरीतच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उबाठाला खिंडार पाडण्याचा चंग एकनाथ शिंदेंनी बांधला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीही किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शिवसेना उबाठाला राजापूर, लांजा तालुक्यात खिंडार पडले होते. किरण सामंत आमदार झाल्यानंतर त्यांनी पक्षवाढीची मोहीम हाती घेतली आहे. त्यात गावातील अनेक शाखाप्रमुख, विभागप्रमुख शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.