आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

130

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारले तेव्हा बांगर हे शिवसेनेमध्ये होते. मात्र, बहुमत चाचणीच्या थोडा वेळ आधी ते शिंदे गटात सहभागी झाले. आता याची गंभीर दखल घेत, शिवसेनेकडून संतोष बांगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी

शिवसेनेसोबत असलेले संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाले. यावर प्रतिक्रिया देताना, संतोष बांगर यांनी म्हटले की, मी माझ्या मतदार संघातील लोकांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांचा सल्ला घेतला. सर्वांचे म्हणणे एकच होते की, राज्यात सध्या बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा हिंदुत्ववादी विचारांचा मुख्यमंत्री होत आहे. त्यामुळे तुम्ही देखील शिंदे गटात सहभागी व्हा. कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आपण शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे, संतोष बांगर यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास मातोश्रीवर जाऊ असेही बांगर यांनी म्हटल्याने ते चर्चेत आले होते. पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

( हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणाऱ्या सुनावणीवर ठरणार शिंदे सरकारचे भवितव्य )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.