मनसेत (MNS) पुण्यामध्ये आधीच नाराजी सुरु पसरली आहे, वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यात संघर्ष सुरू झाला असताना आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मनसेमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या ठिकाणी पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज होते, त्यांची मनसेने हकालपट्टी केली आहे.
जिल्ह्यातील धुसफूस चव्हाट्यावर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेतील (MNS) अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर याठिकाणची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज होते. अखेर गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी मनसे कार्यालयाने पत्रक काढून परशुराम उपरकर आणि प्रविण मर्गज यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही असे जाहीर केले आहे. मनसे (MNS) नेते शिरीष सावंत यांनी पत्र काढून म्हटले आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर, प्रविण मर्गज यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही, संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे कळवले आहे.
Join Our WhatsApp Community