रिसर्च अॅण्ड अनालिसीस विंगचे (RAW) माजी संचालक कर्नल आरएसएन सिंह (रवी शेखर नारायण सिंह) यांच्या ‘भारत के अंदरूनी शत्रू’ या पुस्तकात राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी मुद्द्यांवर देशविरोधी शक्तींची पोलखोल करण्यात आली आहे. भारत बाह्यत: सुरक्षित आहे, पण अंतर्गत असुरक्षित बनला आहे. भारताच्या सुरक्षेसमोर देशाबाहेरील विरोधी शक्तींचे आव्हान उभे राहिले आहे, यावर या पुस्तकात विविध प्रकरणांद्वारे सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.
आक्रमकता आवश्यक
कर्नल आरएसएन सिंह यांच्या मतानुसार, सनातन अनंत आहे, म्हणून तो विस्तारवादावर विश्वास ठेवत नाही. असे असले तरी सनातन आत्मरक्षेवर विश्वास ठेवतो, तेही आक्रमक बचावच्या पद्धतीने. आक्रमक पद्धतीने राष्ट्राची सुरक्षा होऊ शकते. हे पुस्तक अशा शत्रूंचा पर्दाफाश करते जे भारताला हानी पोहचवत आहे. मागील एक-दोन दशकांमध्ये जिहाद, माओवाद, खलिस्तान आणि ख्रिस्ती मिशनरी यांचा परिणाम भारतावर कसा पडला, याचे सविस्तर चित्रण कर्नल आरएसएन सिंह यांनी त्यांच्या पुस्तकात केले आहे.
या पुस्तकात एकूण ४२ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणात राष्ट्रावरील एकेका संकटांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पुस्तकात जिहाद, युद्ध, राष्ट्रीय सुरक्षा, राजकीय हल्ला, कलम ३७० हटवणे, माओवाद, खलिस्तान, चर्च, चीन, मणिपूर, भारताचा सर्वात मोठा घोटाळा आदी विषयांवर विविध प्रकरणांमध्ये प्रकाश टाकला आहे.
Join Our WhatsApp Community