Eknath Shinde : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde : कोकणी माणसाचे बाळासाहेबांशी अतूट नाते आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाची त्यांची बांधिलकी आहे. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

206
Eknath Shinde : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Eknath Shinde : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसैनिकाने एकनाथ शिंदेंना साथ दिली आणि राज्यात सत्तांतर घडले. बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत कार्यकर्त्यांना मोठे केले. परंतु स्वार्थासाठी, मोहापायी, खुर्चीसाठी बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे विचार बाजूला सारून जे काही घडले, ते अघटित आहे. कोकणी माणसाचे बाळासाहेबांशी अतूट नाते आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाची त्यांची बांधिलकी आहे. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता केली आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Elections : भाजपच्या दोन ‘पॉवरफुल्ल’ आमदारांना लोकसभेचे तिकीट नको)

… तर एवढे लोक आले असते का

मुख्यमंत्री शिंदे शिवसंकल्प अभियानासाठी रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात आले आहेत. त्या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. ‘महाराष्ट्रातले शेकडो कार्यकर्ते आमच्यासोबत येत आहेत. त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत (Shiv Sena) दाखल होण्याची ओढ लागली आहे. आमचे पाऊल चुकीचे असते, तर एवढे लोक आले असते का’, असा प्रश्न शिंदे यांनी केला.

बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला ?

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आज बाळासाहेबांना अभिप्रेत होते, ते काम आपण करत आहोत. सत्तेपेक्षा नाव मोठं असते आणि ते जपायचे असते. आज बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पूर्ण करत आहेत. कलम ३७० हटवलं, राममंदिर उभारलं मग बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे ? जे टिंगळटवाळी करत होते, त्यांना मंदिर बांधूनही दाखवले आणि उद्घाटनाची तारीखही सांगितली, असे शिंदे या वेळी म्हणाले.

(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरावर ४४ फूट उंच धर्मध्वज फडकणार)

अडीच वर्षांत महाराष्ट्राला कित्येक वर्षे मागे

आपण आज महायुती म्हणून काम करतो. आज केंद्राकडून राज्याला भरघोस निधी मिळत आहे. पूर्वी अहंकारापोटी केंद्र सरकारकडे पैसे मागितले जात नव्हते. तुम्ही अडीच वर्षात महाराष्ट्राला (Maharashtra) कित्येक वर्ष मागे नेले. जर आम्ही हा निर्णय घेतला नसता, तर आज आपण आणखी मागे पडलो असतो. अत्यंत विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. देशाच्या विकासात महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामा नये. राज्यात तरुणांच्या हाताला रोजगार (Employment) देण्याचं काम उद्योगमंत्री करत आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले. (Eknath Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.