नक्षलींविरुद्धच्या कारवाईत आणखी एक मोठा नेता ठार झाल्याचे उघड!

75

महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० पथकाने तीन दिवसांपूर्वी केलेल्या धडक कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या २७ वर पोहचली आहे. मृतदेह सापडलेल्या नक्षलवाद्यांमध्ये आता आणखी एका नक्षलवाद्यांचा मृतदेह सापडला आहे. तो मृतदेह हा जहाल माओवादी सुखलालचा असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर तब्बल 51 गुन्हे दाखल होते, तसेच 25 लाखांचे बक्षीस होते. याआधी या चकमकीमध्ये ठार झालेल्यांमध्ये नक्षल्यांचा मुख्य नेता मिलिंद तेलतुंबडे याचा मृतदेह सापडला होता.

गडचिरोलीतील चकमकीमध्ये सी-६० कमांडो पथकाच्या कारवाईचे हे मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. ज्या दिवशी चकमक झाली होती, त्यामध्ये आणखी एका माओवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख पटवली असता तो सुखलाल असल्याचे समोर आले. सुखलाल हा माओवाद्याच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य होता. त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस आहे. उत्तर गडचिरोलीसह गोंदीया सीमावर्ती भागातील अनेक गंभीर घटनांचा सूत्रधार आहे.

(हेही वाचा : भगतसिंगांच्या फाशीला गांधींचा होता पाठिंबा! कंगना पुन्हा आक्रमक)

या नक्षली नेत्यांचा खात्मा 

जांभुळखेडा येथील स्फोटात सुखलालची प्रमुख भूमिका होती, ज्यामध्ये १५ जवान ठार झाले होते. त्याच्यावर चकमकीचे 20,  तर खुनाचे 16 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मृत्यूमुळे उत्तर गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या चकमकीमध्ये मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम या जहाल माओवाद्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते. दरम्यान गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकाच्या टीमला जिल्हा नियोजन फंडातून 51 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा यांना तसे निर्देश दिलेले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.