काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण, मी हे विधान आमच्या गावातील मोदी या गावगुडांसाठी केलं आहे, असा दावा पटोलेंनी केला, पण पटोलेंनी दावा केलेल्या सुकळी या गावात मोदी नावाचा एकही गुंड नसल्याने, पटोले चांगलेच तोंडावर आपटले आहेत.
पटोलेंनी शुद्ध थाप मारली?
सुकळी या गावात मोदी नावाचा एकही गावगुंड नसल्याचे, तिथल्या स्थानिकांनी सांगितले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने नाना पटोलेंच्या सुकळी या गावात जाऊन मोदी या गुंडाबाबत विचारणा केली. तेव्हा तेथील ग्रामस्थांनी इथे कोणीही मोदी नावाचा गावगुंड नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी तरुणांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत या गुंडाबाबत चौकशी करण्यात आली. प्रत्येकाने आपल्या गावात मोदी नावाचा गावगुंड नसल्याचेच सांगितले. त्यामुळे पटोले यांनी सारवासारव करत, शुद्ध थाप मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
( हेही वाचा: ‘संजय राऊत म्हणजे नटसम्राट’! फडणवीसांनी केले ‘नामकरण’ )
काय म्हणाले पटोले?
मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षांपासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे, असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.
पटोलेंना अटक करणार का?
या वक्तव्याबद्दल पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. पण अद्याप असा कोणताही गुन्हा पटोले यांच्यावर दाखल झालेला नाही. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना तात्काळ अटक केली होती, मग पटोलेंना आता का अटक होत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
Join Our WhatsApp Community