मुख्यमंत्र्यांची पत्नी आरटीओच्या रांगेत? वाचा…’त्या’ व्हायरल पोस्टमागील सत्य

127

सध्या फेसबुक आणि व्हाॅट्सअॅपवर एक पोस्ट फिरत आहे. ही पोस्ट शिवसेना भवन या पेजवरुन प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी परिवहन कार्यालयात स्वत: जाऊन रांगेत उभे राहून आपले ड्रायव्हींग लायसन्स काढल्याचे सांगण्यात आले आहे. आता त्या व्हायरल पोस्टच्या मागील सत्य शिवसेनेच्या नेत्या डाॅक्टर नीलम गो-हे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकांउटवरुन ट्विट करत सांगितलं आहे. निलम गो-हे यांनी आपल्या ट्विटमध्ये व्हाॅट्सअॅपद्वारे फिरणारी पोस्ट निराधार असल्याचं सांगितलं आहे.

अशी आहे व्हायरल पोस्ट

“मुंबईच्या एका आरटीओ कार्यालयात एक महिला चालत आली, तिच्या वाहनचालक परवान्याची मुदत संपत आली होती व त्याचे नुतनीकरण करण्यासाठी.. त्या महिलेने नुतनीकरण फाॅर्म घेतला तो व्यवस्थित भरला कागदपत्रे घेऊन ती रांगेत उभी राहिली, हळूहळू क्रमांक पुढे सरकत होता. त्या महिलेची कागदपत्रे घेतली नुतनीकरण चलनाचे पैसे भरले आणि सर्व प्रक्रिया आटोपून ती महिला आरटीओ कार्यालयाबाहेर पडणार तोच क्लर्कने कागदपत्रे वाचली सौ. रश्मी उद्धव ठाकरे”. ही पोस्ट शिवसेना भवन या पेजवरुन सध्या व्हायरल होत आहे.

( हेही वाचा :स्वत:चे कर्ज फेडण्यासाठी सरकारी कर्मचा-याने ‘असा’ रचला डाव )

नीलम गो-हे यांचं ट्विट

“व्हाॅट्सअॅपवरील पोस्ट निराधार आहे. असे काही घडलेले नाही, असे मला मा.सौ.रश्मीवहिनी ऊद्धवसाहेब ठाकरे यांनी कळविले आहे. आपल्या सर्वांच्या माहितीस्तव नम्रतापुर्वक सादर”. असं ट्विट करत शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी व्हायरल पोस्ट निराधार असल्याचं सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.